वयक्तिक आणि सार्वजनिक नैतिकता संपत आल्यामुळेच देशात आणि जगात अराजकतेचे स्तोम…….!
*एक चिंतन………*
(पुरवार्ध )
” साधारण 500 वर्षांपूर्वी म्हणजे कोणताही शोध लागण्यापूर्वी जग निसर्गाला व त्याच्या नियमांना समजून घेण्याच्या आणि त्याप्रमाणे वागण्याच्या प्रयत्नात होता. ते केवळ इतर सजीवसृष्टीला नीतिमत्तेच्या आधारे समजून घेत आल्यामुळेच. कारण इतर सजीवसृष्टी आणि मानव यात निसर्गाने भेद करुन मानवाला मेंदू नैतिकतेने विकसिक करण्याची संधी देऊन मानवाचे पारडे जड केले.
परंतू , 16 व्या शतकाच्या सुरुवातीपासून विविध क्षेत्रातील संशोधनाला सुरुवात झाली. तेंव्हापासून 2024 येईपर्यंत याच मानवाच्या भौतिक प्रगतीत सुरुवातीच्या दीडशे वर्षात गोगलगाईची गती, त्यानंतर दीडशे वर्षांनी कासवाची गती, त्यानंतरच्या दीडशे वर्षात शहामृगाची ( इमूची ) चालण्याची गती, आणि त्यानंतरच्या काळात कोरोनाच्या गतीने, शेवटी प्रकाशवर्षांच्या गतीने वेग या जगाने घेतलेला आहे.
*मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीपासून ते 15व्या शतकाच्या शेवटपर्यंत जग हे निसर्गाच्या नियमाने चालत होते. परंतू , जसजसे वैज्ञानिकांनी आपल्या मेंदू आणि हृदय यांच्या संगमातून विकसित केलेल्या विवेकाच्या माध्यमातून नवनवीन शोध लावून वैज्ञानिक क्रांती घडवून आणली. ते केवळ आणि केवळ मानवी कल्याणासाठीच..... 🙏*
*परंतू , त्यांनी लावलेल्या विविध शोधाचा उपयोग राज्यकर्त्यांनी ( विविध प्रकारच्या व्यवस्थेने ) साम, दाम, दंड आणि भेदाच्या कुटनीतीच्या आधारे मानव व्यतिरिक्त इतर सजीवसृष्टीला आपले गुलाम बनविले. पुढे चालून, पुढे जाऊन यांनी मानवा - मानवात सुद्धा वर्ण, लिंग, धर्म इत्यादी भेदाच्या भिंती निर्माण करुन नैतिकतेला जगाच्या वेशिवर टांगण्याचा प्रयत्न केला. परिणामी दोन पायाचा मानव दानव होण्यास सुरुवात झाली. यामध्ये अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक (यामध्ये अल्पसंख्यांक नेहमी निसर्गवादी राहत आलेले आहेत ) यांची फळी निर्माण होऊन यांच्यातील मतभेदाचा संघर्ष म्हणजे जगातील अनेक रक्तरंजित क्रांत्याचा इतिहास होय. या इतिहासात अमेरिकन राज्यक्रांती, अमेरिकन यादवी युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, जपानची मेईजी क्रांती, प्रथम आणि द्वितीय महायुद्ध ही त्याची उदाहरणे होत.*
*द्वितीय महायुद्धाच्या महाविनाशानंतर पुन्हा एकदा जागतिक नीतिमत्तेला पुनःरुजीवित करण्याचा सार्वजनिक प्रयत्न केल्या गेला. परंतू , त्यात 100% देश सहभागी न झाल्यामुळे केवळ 80 वर्षात ही शांतता पुन्हा भंग होण्याच्या मार्गावर येऊन ठेपलेली आहे.*
*आता संपूर्ण विश्व् पुन्हा एकदा सार्वजनिक नैतिकता संपत आल्यामुळेच मानवी जीवन हे अराजकतेकडे वाटचाल करत आहे.........*
टीप :- या लेखाचा उर्वरित भाग उद्याच्या भागात….. 🙏
*जागृतीचा कृतिशील लेखक :- अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 )*
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत