निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

निवडणुका / राजकारण हे चालत असतं की तुमची उपयुक्ततता किती आणि ऊपद्रवमूल्य किती


65% आणि त्यापेक्षा जास्त मतदान झालय.. इथे हे सत्ताविरोधी की त्याच सत्तेला परत.. हे सांगणे कठिणच..
पण महिलाच्या रांगा बघून लाडली बहीण ही योजना फ़ळाला आलेली दिसतेय…
व्होट जिहाद हा एक नवीन फंडा या निवडणुकीत बघायला मिळाला.. उलेमा चे 12 की 17 कलामांचे पत्र आणि त्याला मविआ नी दिलेली(?) मान्यता हा विषय गाजला.. त्यामुळे एक है तों सेफ है हे बऱ्यापैकी तळागाळात पोचलेले आढ़ळले..
योगीनी येऊन बैट फिरवली बटेंगे तों कटेंगे आणि मग ते सावरून एक है.. सेफ है असे पांघरुण ही स्ट्रेटेजी असावी.. जी यावेळी नेमकी योग्य ठिकाणी बसली असावी असे म्हणायला जागा आहे.. विरोधी पक्ष हे कोड़े सोडवण्यातच गूंतुन गेला..
कांदा, टोमेटो, सोयाबीन,.. कांदा परदेशी निर्यात हे प्रश्न केन्द्राने वेळेवर सोडवण्याचा प्रयत्न करुन शेतकरी वर्गोंची थोडी समजूत घातली…
संविधान चा जो प्रश्न लोकसभेत होता तो ख़ारीज करण्यासाठी किरण रिजीजू ( जे स्वतः नवबौद्ध असून Minister of Parliament affairs and minister of minority affairs आहेत ) त्याना महाराष्ट्रात आणून त्यावर भाष्य करायला लावले…
दिव्यांग आणि 80 च्या वरती जे प्रत्येक विधान सभेच्या क्षेत्रोंत 3 ते 4 हजार आहेत त्यांचे मतदान करुन घेण्यासाठी RSS ची फौज होती..
वारकरी जो कष्टकरी आणि ख़ूप मोठा समुदाय आहे त्यांच्या सोबत 60000 छोट्या छोट्या बैठका घेऊन युती ला का मतदान यासाठी पण RSS कार्यरत होती..
लोकसभेतील हार लक्षात घेऊन BJP ने एकही क्षेत्र सोडले नाही की काही कमतरता राहील.. बूथ म्हणजे माइक्रोलेवल वर दिग्गज लोक नजर ठेवून होते.. सायंकाळी 5 नंतर सर्वात जास्त मतदान झाले ते यामुळे..
जरांगे factor जो लोकसभेंत यशस्वी ठरला तों यावेळी किती प्रभाव पाडेल ते 23 तारखेला समजेल..
अजित पवार हे थोडे बैकसीट वर वाटले शरदजीं समोर… अशोक चव्हाण मुलीसाठी धड़पड़ताहेत.. पण एक मोठा मराठा चेहरा म्हणून अशोकराव असोत किंवा अजित पवार असोत.. प्रभाव इतका वाटला नाही…
एकनाथ जी मात्र लोकाना जवळचे वाटताहेत ही परिस्थिति आहे..
कांग्रेस कडे मोठा नेता नाही हे दुदैव आहे..
शरदरावाना मानायला हवे की या वयात इतकी ऊर्जा आणि लोकांशी जबरदस्त कनेक्ट.. त्यामुळे त्यांची अजित पवार यांच्यावर सरशी होऊ शकते..
Exit pol ही डोकेदुखी आहे.. Exact पोलखोल 23 ला होईल..
तोपर्यंत हे हवेतले बाण..
एक मात्र नक्की विधानसभेची निवडणुक होती की ग्रामपंचायतीची हे समजण्यात सारखी गफलत होत होती
जयमहाराष्ट्र

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!