बाबासाहेबांची भाग्यशाली खुर्ची.

पुणे येथील सिम्बॉयसिस कॉलेजच्या प्रांगणात बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे आहे. या संग्रहालयात बाबासाहेबांच्या विविध पोशाखातले, डोक्यावरील गोल टोपी, काउंटी सरकॅप, खानसमा, उभट असलेली पांढरी टोपी अशा विविध फोटोग्राफी ते पाहावयास मिळतात. माईसाहेब आंबेडकरांनी या संग्रहालयामध्ये सर्व वस्तू भेट दिलेली आहेत. त्याचबरोबर बाबासाहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना लिहिलेली पत्रे पहावयास मिळतात. बाबासाहेबांनी वापरल्या वस्तू पहावयास मिळतात. विविध प्रकारचे पेन, बाबासाहेबांना पुस्तक खरेदी करण्याची जे वेड होते तसेच विविध प्रकारचे पेन विकत घेऊन वापरण्याचा त्यांचा छंद होता. त्या वेगवेगळ्या पेनच्या माध्यमातून बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिली आहे. संग्रहालयात बाबासाहेब त्या टेबलावर बसून लिहावयाचे. त्या टेबलावर सर्व लेखनाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. एका हँगरला बाबासाहेबांचा ग्रे कलरचा बंद गळ्याचा कोट आणि पॅन्ट अडकवलेली आहे. समाजासाठी आणि देशासाठी ते सर्वत्र फिरले समाजाचे दैन्य पाहिले. देशातील समाज व्यवस्था पाहिली दुःख दारिद्र्य पाहिले. अंधश्रद्धा, श्रमिकांचे शोषण, रानावनातून, कोळशाच्या खाणीतून अखंड प्रवास करून त्यांनी आपला ध्येय झीजवला. त्यांच्या पायाचे बुट संग्रहालयात ठेवून त्याची जपणूक केली आहे. बाबासाहेबांचा चरण स्पर्श झालेल्या बुटास पाहताना विनम्रपणे आपले हात जोडतात. बाबासाहेबांना कलेची संगीताची आवड होती. त्यांनी इंग्लंडमधून व्हायलेन विकत घेतले होते. ते मुंबईतील साठे नावाच्या वादकाकडून व्हायलेन वाजवण्यास शिकले होते. अनेक व्यापातून बाबासाहेब ते वाजवीत रमत असता
. तो झंकार आता थांबला आहे अशा अनेक वस्तू तिथे ठेवलेले आहेत या कॉटरवर त्यांनी चिर विश्रांती घेतली तो पलंगही येथे आहे. या सर्वांमध्ये मनाला भावणारी मोठी वस्तू म्हणजे बाबासाहेबांची विशाल भाग्यशाली खुर्ची खुर्चीचा आतील आकार मोठा होता बाबासाहेबांची ध्येयष्टी मोठी होती त्यांना सर्वसामान्य खुर्च्या चालत नसे त्या खुर्चीवर बसून त्यांनी या देशाचे संविधान लिहिले अनेक ग्रंथाला याच खुर्चीवर बसून त्यांनी जगाला प्रबोधित केले अखेरचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा प्रसिद्ध ग्रंथ याच खुर्चीवर बसून लिहून पूर्ण केला आणि शेवटी काठी टेकीत टेकित आपल्या अभ्यासिकेतून शयनगृहाकडे जाताना ते गुणगुणत होते “चलो कबीर तेरा भव सागरडेरा” दत्ता गायकवाड, सोलापूर. 7588266710
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत