राजपूत समाज सेवा संघाचा स्नेहमेळावा व गुणीजणांचा सत्कार सोहळा संपन्न
राजपूत समाज सेवा संघ,महाराष्ट्रतर्फे आज ठाणे येथे राजपूत समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.तसेच राजपूत समाजातील ज्या सदस्यांनी विविध क्षेत्रात उच्च पदे प्राप्त केली तथा उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळविला,त्यांचा सत्कार माजी आमदार श्री.रविंद्र फाटक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना मा.आमदार श्री.रविंद्र फाटक म्हणाले की,राजपूत समाजाला पुढील काळात जी जी मदत लागेल,ती त्यांना त्वरेने दिली जाईल.तसेच राजपूत समाजाच्या हॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील.महत्वाचे म्हणजे मेवाडचे राजा महाराणा प्रतापसिंह यांचा ठाणे शहरात भव्यदिव्य अशारुढ पुतळा उभारण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल,असे आश्वासन दिले.फाटकसाहेबांनी यावेळी सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम ठाणे(प.) येथील संकल्प चौक स्थित पंडित राम मराठे सांस्कृतिक कला क्रीडा केंद्र येथे संपन्न झाला. ठाणे स्थित राजपूत समाज सेवा संघाची स्थापना सन २००३ मध्ये झाली असून,विजयसिंग राजपूत उर्फ विजूताथ्या हे त्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सर्वपरिचित आहेत.प्रारंभी अध्यक्ष आर.के.पाटील यांनी प्रास्ताविक करून संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला तर,शेवटी संघाचे सचिव नरेंद्रसिंग पाटील यांनी प्रमुख पाहुणे अन् प्रेक्षकांचे आभार मानले.कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.
या कार्यक्रमास सौ.जयश्री रविन्द्र फाटक,संघाचे अध्यक्ष आर.के.पाटील राजपूत समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह राजपूत,संघाच्या महिला अध्यक्ष सौ.आशाताई पाटील,उपाध्यक्ष गुलाबसिंग गिरासे,सचिव नरेंद्रसिंग पाटील,कोषाध्यक्ष राजेंद्र सिंग पाटील,युवा मंचचे प्रमुख महेंद्रसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे ठाणे,उल्हासनगर,बदलापूर,कल्याण,अंबरनाथ,डोंबिवली मुंबई,नवी मुंबई,पनवेल आदी शहरांमधील राजपूत समाजाचे पदाधिकारी या स्नेहमेळाव्यात उपस्थित होते.त्यांचाही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वागतपर सत्कार करण्यात आला.
या स्नेहमेळाव्यात सर्वश्री भालचंद्र चव्हाण,आनंदसिंग पाटील,राष्ट्रीय बॅडमिंटनपटू कु.मयंक गिरासे,मयूर गिरासे,सुदाम परदेशी,सागर बोराडे,श्रीमती अनिताताई परदेशी,डॉ.वसंत राजपूत,नारायणसिंग राजपूत,जगतसिंग गिरासे,रोहितकुमार राजपूत, प्रदिपसिंग पवार,संभाजी शेलार,राजेश सोलंकी,
विरेंद्रसिंग राजपूत यांचा प्रमुख पाहुणे श्री.रविंद्र फाटक यांच्या हस्ते शाल
पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत