महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

पवार साहेब हेच का तुमचे पुरोगामीत्व….!

डॉ.कुमार लोंढे

शरद पवार साहेबांना एवढे दिवस महाराष्ट्रातील तमाम जनता शेतकऱ्यांचे कैवारी,पुरोगामी, जाणते राजे, देशाचे नेते असे  उपाधी देऊन  त्यांचं काळीज सुपाएवढे आहे हे असा भास निर्माण होत होता. शरद पवार साहेबांनी सुभेदार व जहागीरदार निर्माण करण्याचे आणि सत्तेमध्ये केवळ प्रस्थापित मराठ्यांना सामील करून इतरांना त्याचे दास बनवण्याचे मोठे कटकारस्थान त्यांच्याकडून झालेले आहे ( अपवाद वगळता रामदास आठवले, लक्ष्मण ढोबळे) पवार साहेब नेहमी दोन्ही जातींना समोरासमोर लढवून संपवण्याचे कटकारस्थान रचत असतात आणि हे अनेक वेळा  सिद्धही झालेल आहे परंतु ज्या पवारसाहेबांनी फोडाफोडीचे राजकारण केलं त्याच पवारांचा पक्ष फुटला हे सर्व महाराष्ट्र जाणतो आहे. 

महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा या अनुषंगाने काही बाबी प्रकर्षाने मांडणे ममहत्त्वाच आहे माळशिरस मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे यामध्ये दोन टर्म हनुमंत डोळस चर्मकार आणि एक टर्म राम सातपुते अशा तीन टर्म विजयसिंह मोहिते पाटील यांनी चर्मकार उमेदवार दिले त्यांना येथील दलित , मातंग,बौद्ध, चर्मकार,होलार बांधवांनी सगळ्यांनी निवडून ही दिल साहजिक जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतणी भागीदारी या प्रमाणे चर्मकार सोडून मातंग,बौद्ध यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित होते

महत्वाचा मुद्दा असा आहे ही जागा (SC 254) अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्या जागेवर अनुसूचित जातीचा ओरिजनल उमेदवार पाहिजे परंतु धनगर समाजातील काही व्यक्तींनी बनावट अनुसूचित जातीचे दाखले काढले आहेत.हा धनगर समाज केंद्रामध्ये ओबीसी आणि राज्यामध्ये एनटी चा दर्जा असताना सुद्धा अनुसूचित जागेवर अतिक्रमण करून त्याचे हक्क हिसकावून घेतोय.या प्रकारास आदरणीय महादेव जानकर यांनी कडाडून विरोध ही केला आहे अशा नेत्याचे दलित बांधव स्वागतच करत आहेत.

राखीव (SC)माळशिरस मतदार संघात उत्तम जानकर (जात धनगर) यांना उमेदवारीचा घाट घातला जातोय व उमेदवारी दिली जाते एकीकडे स्वतःला आपण पुरोगामी म्हणून घ्यायचे आणि दुसरीकडे त्या दलितांच्या हक्काच्या जागेवर विधानसभेच्या एस सी च्या जागेवर अतिक्रमण करायला भाग पाडायचं हे फारच विदारक आहे.या संदर्भात माळशिरस तालुका अनुसूचित कृती समिती ने पवार साहेबांना भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली आहे. फलटण मतदार संघात सुद्धा असाच संघर्ष आपणास पाहण्यास मिळतो आहे.भाजपचे माढा लोकसभेचे माजी खासदार रणजिसिंह निंबाळकर यांनी फार चांगली भूमिका घेऊन मी बौद्ध समाजाबरोबर आहे असे जाहीर केले आहे.शनिवार दिनांक (१९) इंदापूर मध्ये बहुजन समाज जागृती मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ व मी (डॉ.कुमार लोंढे) ही प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो यावेळी आदरणीय मेश्राम साहेबांनी एक सुंदर उदाहरण दिल हातामध्ये पेन घेतला आणि समोर उपस्थित लोकांना सांगितल हा पेन म्हणजे दलाल आहे आणि हाताला धक्का दिला तर तो पेन हातातून गळून खाली पडला याचा अर्थ दलाला धक्का द्यायची गरज नाही जे हात दलाल निर्माण करतात त्या हाताला आपणास धक्का द्यायला लागेल म्हणजे दलाल ही राहणार नाही दलाल निर्माण करणारी व्यवस्था ही राहणार नाही.दलालांना दोष देऊन उपयोग नाही तर दलाल निर्माण करणाऱ्या व्यवस्थेवर आपल्याला आघात घालायला लागेल असं आपण ठाम ठरवलं पाहिजे.

शरद पवार साहेबा सारख्या स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या व फुले -शाहू -आंबेडकर यांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या व्यक्तीने असे वागणे हे पातक आहे.हे महाराष्ट्राला न शोभणार कृत्य आहे एकीकडे उत्तम जानकर (धनगर) SC जातीचा दाखला काढून दलितांच्या जागेवर अतिक्रमण करून लढतात आणि दुसरीकडे शरद पवार इतर मतदारसंघांमध्ये सांगतात की हे आमच्याकडे धनगर समाजाचे नेते आहेत किती दिवस दलितांचा बुद्धिभेद करणार आहात पवार साहेब! उत्तम जाणकरांना दोष देऊन उपयोग काय? उत्तम जानकरांना निर्माण करणारी व्यवस्था ही भयंकर आहे त्यामधे ते ही भरडले जातील असा विश्वास आहे.माळशिरस तालुक्याचे मोहिते पाटील राष्ट्रवादी चे शरद पवार यांना आता अद्दल घडवण्याची वेळ आलेली आहे.

शरद पवारांनी जे सुभेदार निर्माण केले ते ठराविक घराण्यातलेच आहेत. सत्ता कुणाची येऊ द्या काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस,सेना ,भाजपा असेल तरी ही त्या सत्तेचं सगळ्यात जास्त बेनिफिट इथल्या दीडशे ते 170 प्रस्थापित घराण्यालाच मिळालेले आहे . देवेंद्र फडणविस यांच्या मार्फत शरद पवारांना नेहमी चॅलेंज झालं आहे.धर्मसत्तेच आणि राजसत्तेच ज्यावेळेस भांडण निर्माण झालं त्यावेळेस देवेंद्र फडवणीसाची एक जमेची बाजू समोर आली की त्यांनी महाराष्ट्रातली प्रस्थापित घराणे संपवली पवाराची हुकूमशाही जहागिरी संपवण्यामध्ये देवेंद्र फडवणीसाठी पुढाकार घेतला याचा अर्थ असा आहे की राजसत्तेला धर्म सत्तेन आव्हान दिलं. संविधान धोक्यात आहे हे प्रकाश आंबेडकरांनी अग्रक्रमाने सांगून तो मुद्दा निर्माण केला तो मुद्दा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हायजॅक केला.हा मुद्दा आपल्याकडे खेचून घेतला आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त कांग्रेस व राष्ट्रवादी ने जागा मिळवल्या .

बांधवानो मुद्दा आहे आपल्या हक्कासाठी आज मराठा लढतो आहे आपल्या हक्कासाठी आज ओबीसी लढतो आहे आपल्या हक्कासाठी दलित लढतो आहे एससी एसटी लढतो आहे व हे सगळं होत असताना शैक्षणिक आरक्षण आम्ही समजू शकतो इतर सोयी सवलती आम्ही समजू शकतो पण आमच्या राजकीय आरक्षणावर जर गडांतर येत असेल तर काय करायचे?माळशिरस तालुक्यामध्ये जे स्वतः ओरिजनल धनगर आहेत परंतु त्यांनी हिंदू खाटीक एससी जातीचे दाखले काढलेत अशाची लिस्ट जवळजवळ 36 च्या आसपास आहे आणि हा माळशिरस मतदार संघ चर्चेचा विषय झाला आहे .हिंदू खाटीक ओरिजिनल असेल तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं परंतु येथे धनगर समाजाच्या व्यक्तीने हिंदू खाटीक हे प्रमाणपत्र काढून एससी च्या जागेवर अतिक्रमण करण कितपत योग्य आहे .

माझा प्रश्न पवार साहेबाना आहे तुम्हाला एवढी सहानभूती असेल तर पवारांनी बारामती मध्ये उत्तम जानकर यांना उमेदवारी द्यावी. पवारांनी मोहिते पाटलांना थांबा म्हणावं आणि माढा विधानसभा जागेवर त्यांनी उत्तम दरकरांना उमेदवारी द्यावी हा घाट का घातला जातोय हा कळीचा मुद्दा नव्हे तर महाराष्ट्रभर या मुद्द्यावर येणाऱ्या काळामध्ये आपणही दलित बांधवांनी विचार विनिमय करणे गरजेचे आहे

रात्र नव्हे तर दिवस ही वैऱ्याचा आहे प्रत्येक जण स्वतःच्या जातीसाठी झगडतो आहे महाराष्ट्रातील 18 पगड जातीतल्या एससी, एसटी लोकांनी जागृत झालं पाहिजे आणि आपला हक्काचा न्यायाचा लढा उभारला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी आमच्या हक्कावर गदा येईल तिथे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस असो अथवा शरद पवार असो अथवा कोणी ही असो दलाल निर्माण करणारी व्यवस्था मुळासकट उखाडून फेकली पाहिजे.या शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसला आपणअद्दल घडवली पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण महाराष्ट्रातील तमाम बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान न करता बहिष्कार टाकावा या पद्धतीत आपण सर्वांनी निर्णय घ्यावा या निर्णयाचा फटका सत्तेला ज्यावेळेस बसेल त्यावेळेस त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याशिवाय राहणार नाही

आमच्या अधिकाराचा लढा आता आम्हाला लढावा लागेल अन्यथा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारास आम्ही गद्दार झालेलो आहे असे समजण्यात हरकत नाही. माझेही उत्तमराव जानकर यांच्याशी चांगले संबंध आहेत ते आमचे चांगले मित्र आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमांमध्ये ते असतात परंतु हा लढा वैचारिकतेचा आहे उत्तम जानकर अथवा मोहिते पाटील अथवा शरद पवार कोणत्याही व्यक्तीशी व्यक्तिगत वादाचा विषय नसून हा वैचारिक वाद आहे हा लढा तीव्र करण्यासाठी आपली साथ व सहयोग महत्वाचा आहे हा लढा तीव्र केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही . समाजासाठी SC/ST साठी वाटेल तेवढा संघर्ष व त्याग करण्याची माझी तयारी आहे. बांधवांनो आपण जास्तीत जास्त पोस्ट शेअर करा व या लढ्याला पाठबळ देण्यासाठी पुढे या…आपले अभिप्राय नक्की द्या लवकरच पुढील दिशा ठरवू या..
एससी/एसटी जागा हो….

जय भीम जय संविधान

(लेखक डॉ.कुमार लोंढे
अध्यक्ष सेंट्रल ह्युमन राईट संघटन
गारवाड माळशिरस सोलापूर)
मो.7020400150
मेल -londhekumar77@gmail.com
दिनांक 23/10/2024

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!