ईव्हीएम वर कानाडोळा झाला तर चोर डल्ला मारतील – प्रा. देविदास इंगळे
इलेकशन 2024 महाराष्ट्र विधानसभा तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुका ईव्हीएम वर होणार आहेत याचे भान असू दया विशेष त्याकडे कटाकक्षाणे लक्ष असू दया आपण गाफिल राहिलो तर शत्रू डाव मारून नेईल.
सत्तेसाठी टपलेली गिधाडे कोणत्याही थराला जाऊ शकतात काहीही करू शकतात केवळ ईव्हीएम एकच विषय नाही पण हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे म्हणून याकडे सर्वांचं लक्ष असणं अंत्यत आवश्यक आहे.
सत्तेसाठी पैसा मोठया प्रमाणात वापरल्या जाईल जसे की खोके – ओके असे गाजलेले विषय आहेत यातून जनतेनी धडा शिकला पाहिजे पैसा देणे आणि घेणे हे विकासाआड येते म्हणजेच जनतेला उमेदवाराणे दिलेला पैसा काढण्यासाठी उमेदवार पैशाचे मार्ग शोधत रहातो आणि विकासाला वेळच मिळत नाही म्हणून जनतेनी पैसा घेणे टाळावे व विकास करणाऱ्या पक्षाला निवडून दयावं.
आपलं दिलेलं मत आपण दिलेल्या पक्षालाच झाले का ते तपासावे vvpat मध्ये चिठी पडल्याचा आवाज येतो त्यावेळी ते चिठी वर केलेलं मतदान चेक करता येते याकडे लक्ष असावं.
अनेकवेळा माग्गणी करून सुद्धा केंद्र सरकार व राज्य सरकार जनतेचे ऐकत नाही याचाच अर्थ असा की ही सरळ सरळ हुकूमशाही आहे हे संविधान आणि लोकशाही ला बाधक आहे आणि ही हुकूमशाहीकडे होणारी वाटचाल आपणास रोखावयाची आहे आणि ते आपले सर्वांचं आध्य कर्तव्य आहे त्याचबरोबर लोकशाहीने न चालणाऱ्या सरकारला सुद्धा रोखयचं आहे.
निवडणुकीत होणारे सर्व गैरप्रकार जनतेनी हाणून पाडून देशात संविधानाने लोकशाही राज्य निर्माण होईल याकडे कटाक्षाने लक्ष केंद्रित करून संविधानाने लोकशाही नांदेल असे काम करावे.
साथ दया साथ घ्या व गुलामी टाळा.
धन्यवाद
आपला स्नेही
प्रा. देविदास इंगळे
राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत