डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर उपदेश —!!

“शिक्षण व विद्या या गोष्टीशिवाय उद्धार होणार नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक कार्ये अंगिकारली . राजकारणात माझा विशेष महत्वाचा
काळ गेला. सध्या राजकारणाच्या दोऱ्या उच्चवर्णीयांच्या हातात आहेत.
त्या दोऱ्या तशाच हाती ठेवण्यासाठी उच्चवर्णीयांची धडपड चाललेली आहे. उच्च प्रतीच्या माऱ्याच्या जागा पटकाविण्यासाठी जी
विद्या पाहिजे ती अजून उच्चवर्णीयाखेरीज इतरांना प्राप्त झालेली नाही.
जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच, असे कांही म्हटले जाते त्याचप्रमाणे राजकारणाच्या दोऱ्या विद्येशिवाय आपल्या हाती येणार नाहीत राजकीय सत्ता हाती यावी म्हणून अनेकांनी प्रयत्न चालविलेले आहेत पण त्यांना यश येत नाही.
ह्या तफावतीचे अधिष्ठान हेच आहे.
इंजिनीअर, कलेक्टर वैगरे जागा फक्त उच्चवर्णीयांनाचशिक्षणामुळे मिळतात शंभरपैकी जवळ जवळ ९९इंजिनिअर९९कलेक्टर असे उच्चवर्णीयांचे असतात.
त्यामुळे त्यांच्या हाताखालील जागा ते आपल्या लोकांना देत असतात. “.
“ह्या नाईट स्कुलचा फायदा तुम्हाला फक्त कारकुन होण्यासाठी होणार नसून त्यामुळे तुम्ही माऱ्याचा जागा देखील काबीज करण्यासाठी आहे.
रात्रीच्या शाळेचा प्रयत्न स्तुत्य आहे.
या शाळेला मला जे जे सहाय्य देता येईल ते मी जरूर देईन , वार्षिक एक हजार रुपयाची ग्रॅट, नाईट स्कुलला देण्याचे मी निश्चित केले आहे.
तसेच जे काही २००–३००रुपये क्रमिक पुस्तकांसाठी लागतील तेही देईन . म्हणजे जे जे म्हणून मला देता येईल ते सर्व काही देईन . तुम्ही सर्वांना याचा फायदा करून घेतला पाहिजे. “
तुम्ही स्वच्छ राहीले पाहिजे येथे झकपक कपडे घातलेले विद्यार्थी दिसले कुठल्याही आर्टिकलमध्ये ती वस्तुस्थिती नसुन स्तुती आहे.
एक नुर आदमी व दसनुर कपडा अशी म्हण आहे .
बाहेर पडतांना तुमचा पोषाख स्वच्छ
पाहिजे. कपडे पाहूनच तुमच्याबद्दल प्रथम आदर वाटला पाहिजे. “
तुम्ही भरपूर वाचन केले पाहिजे. रोज अर्ध पुस्तक संपवण्याचा सराव करावा.आपली नवी इमारत पाहिजे म्हणजे १०००–१००० विद्यार्थ्यांची सोय होईल. असे काही करता येईल .
दिवसभर काम करून रात्री ५ते१०वाजे पर्यंत तुम्ही शिक्षण घेता हे भूषणावह आहे. तुम्हाला मी यश प्राप्ती चिंतीतो. “
असे हे बाबासाहेबांचे अनुभवी थोर
विचार.
जयभीम नमोबुद्धाय जयभीम 🙏
संदर्भ —डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना उपदेश —!!
पुष्ठ क्रमांक २६–२७
संकलन —शशांवा.
X

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत