कारवाई टाळण्यासाठी पाठिंबा दिला का? शरद पवारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

सक्तवसुली संचालनालय (ईडी) तसेच प्राप्तिकर खात्याची कारवाई होईल, या भीतीने आमचे आमदार भाजपत गेले’ या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये आम्हाला पाठिंबा देऊ केला होतात, तो कोणत्या कारणामुळे, असा सवाल केला आहे.
पवारसाहेब कोणत्या कारवाईला घाबरून येत होते, हे त्यांनीच सांगावे’, असा प्रश्नही फडणवीस यांनी केला. ते म्हणाले, की २०१९ मध्ये भाजप-शिवसेनेचे सरकार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख या नात्याने पवारसाहेबांनी आम्हाला पाठिंबा दिला होता, तो कोणत्या कारवाईच्या भीतीमुळे? २०१९ च्या आधी २०१७ मध्येही पवारांनी भाजपला पाठिंबा देऊ केला होता. तेव्हा कोणत्या कारवाईची भीती होती?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत