
बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांच्या विचारांना गद्दार कधीही न होणाऱ्या एका शहीद पोचिराम कांबळे यांची कहाणी)
पोचीराम कांबळे यांना गावगुंडांनी हाल हाल करुन ठार मारले. ते इतके भयानक होते की २०० लोकांच्या जमावाने पोचीराम कांबळेला पकडून त्यांचा अमानुष छळ करुन पहिला त्यांचा हात काढण्यात आला व गावगुंड पोचीरामला मारत मारत म्हणायचे, “ सांग पोच्या तू जयभिम करणार का” पोचिरामला इतक्या वेदना होत असतानाही म्हणाला, “ जयभिम म्हणणार”. नंतर दुसरा हात काढला दोन हात काढल्यानंतर एक पाय काढला तरी पोचीराम चिडून `जयभिम‘ म्हणून ओरडायचा नंतर दुसराही तोडला तेंव्हा पोचीरामचे रक्त सांडलेले होते.पोचीरामचे दोन हात व दोन पाय मराठवाड्यातील हैवानांनी तोडले होते. तेवढ्यातही पोचीराम जयभिम म्हणत होता, पोचिराम याचे फक्त तोंड राहिले होते. त्यांनी बजावले, “पोच्या, आता तुझे फक्त मुंडके राहिले आहे. सांग जयभिम करणार का? जयभिम” म्हणून बोलत असतांना त्या हरामखोरांनी तलवारीने मान छाटताच जयभिम हा शेवटचा नारा बोलला. सर्व रक्त जातीयवादी गुंडांच्या अंगावर उडून पोचीरामच्या रक्ताने अनेक पँथर निर्माण झाले.नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील टेंभुर्णी ह्या गावी पशुलाही लाज वाटेल असा प्रकार केला होता.
(प्रा. अरुण कांबळे यांच्या मुलाखतीतून)
आपल्या बापाच्या खुनानं चिडलेल्या चंदर पोचिराम कांबळे यानं त्याच त्वेषानं पलटवार करत जातीयवादी गावगुंडाचा फडशा पाडला. एकट्या चंदरनं चार जणांना लोळवलं. शेवटी चंदर पोचिराम कांबळेचाही बापासारखाच खून केला गेला. तीच रित परत आळवली गेली. त्याला सुद्धा तोच प्रश्न परत विचारत विचारत शरिराचा एकेक अवयव तोडण्यात आला… सांग चंद्या जय भीम बोलशील का ?
चंदर हो म्हणायचा.. आणि एक अवयवर तोडला जायचा.
या चंदर पोचिराम कांबळे यांचा आज स्मृतीदिन. नांदेडमध्ये त्यांच्या गावी होतो दरवर्षी छोटेखानी कार्यक्रम. गुजरात मध्ये जे मागासवर्गीय प्रखर जिद्दीनं पेटून उठले आणि पलटवार केला. त्या प्रत्येकात आम्ही चंदर आणि पोचिराम कांबळे पाहीला.
हिंसा करणं गुन्हा आहे. प्रतिकार करणं नैतिक अधिकार…
चंदर पोचिराम कांबळेंच्या स्मृतींना अभिवादन
जय भीम.
थडग्यातून उठुन “पोचीराम” नाचला,
आई सांग साऱ्यांना मला “जय भीम” पोहचला.
नाचु दे, गाऊ दे, विसरून देहभान,
“नामांतर” झाले हे ऐकुन तृप्त झाले कान.
मानाचा शिरी मी शिरपेच खोचला,
आई सांग साऱ्यांना मला जय भीम पोचला…
कवी .. गौतम धुमाळ.
सध्याच्या काही तथाकथित बौद्धांना वाटते की आम्हीच फक्त रस्त्यावरती येतो आम्हीच फक्त आंदोलन करतो. पण एक लक्षात घ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य हे एका जातीपुरते नव्हते ,एका धर्मापुरते नव्हते तर ते समस्त भारतीयाकरिता होते अन्याय अत्याचार ज्यांच्या ज्यांच्यावर होतो त्या लोकांकरता होते. समानतेची वागणूक मिळावी याकरता त्याचे कार्य होते. आणि याच मुळे नामांतर च्या लाडक्या ज्या पोचीराम कांबळे यांना हाल हाल करून सनातन विचारांच्या लोकांनी मारले. पोचीराम कांबळे ते आंबेडकरी विचाराचेच
मातंग समाजाचे होते .
नुकताच परभणी येथे झालेले हल्ल्यामध्ये ज्याला मारले ते सूर्यवंशी हेही बाबासाहेबांच्या विचाराचा होता वडार समाजाच्या
त्यामुळे आपापसातील जातीजातीत आपणच भेदाभेद करतो की काय असे वाटते आपण संख्येने जास्त आहे त्यामुळे आपण लहान जाती समूहाला आपल्यापासून तोडू नये ही अपेक्षा.
यश भालेराव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत