” बौद्धांची आचारसंहिता “
💎 आयु. राज जाधव
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा
भारतीय बौद्ध महासभा
संस्थापक बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
व्दितीय राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर
१) तथागत भगवान गौतम बुद्ध, धम्म आणि पवित्र भिक्खूं संघांचा आदर करणे. ही बौध्दांची प्रमुख आचारसंहिता आहे.
२) प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, संत कबीर, महात्मा जोतिराव फुले, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांचा आदर करणे. ही बौध्दांची प्रमुख आचारसंहिता आहे.
३) बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदिक्षेवेळी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा पाळणे. ही बौध्दांची प्रमुख आचारसंहिता आहे.
४) पंचशील गृहस्थी उपासक – उपासिका यांसाठी दैनंदिन आचारसंहिता आहे.
५) अष्टांगिक मार्ग गृहस्थी उपासक – उपासिका यांसाठी दैनंदिन आचारसंहिता आहे.
६) दहा पारमिता गृहस्थी उपासक – उपासिका यांसाठी दैनंदिन आचारसंहिता आहे.
७) बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या आर्थिक दान करावे. तिचे कार्य करावे, तिला वाढविण्याचा प्रयत्न करावे ही आपली नैतिक आचारसंहिता आहे.
८) बौध्द धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी तन – मन – धनाने मदत करा. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील समाज निर्माण करण्यासाठी सामाजिक व धार्मिक कार्यात भाग घ्यावा, श्रमदान करावे. ही बौद्धांची आचारसंहिता आहे.
९) दर रविवारी पौर्णिमेला विहारात वंदना, प्रवचनात भाग घेणे. ही बौध्दांची आचारसंहिता आहे.
१०) विहारात जाताना, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होते वेळी सफेद वस्त्र परिधान करावे. ही बौध्दांची आचारसंहिता आहे.
११) बौध्द धम्माचे मंगलदिन साजरे करावे. मंगलदिन साजरे करण्यासाठी भाग घ्यावा व उचित असे धम्मदान द्यावे. ही बौद्धांची आचारसंहिता आहे.
१२) आपल्या परिवारातील संस्कार विधी करताना संस्कार विधी बौद्ध भिक्खू कडून करून घ्यावा किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेच्या सनदधारी बौध्दाचार्यांकडून करून घ्यावा. असे करणे बौध्दांची आचार संहिता आहे.
१३) बौद्ध कुटुंबातील स्त्रियांनी, मुलांनी, पुरूषांनी संस्थेच्या धम्म शिबिरांमध्ये प्रशिक्षण घ्यावे ही बौद्धांची आचारसंहिता आहे.
१४) बौध्द कुटुंबातील स्त्रियांनी अंधश्रद्धा पाळू नये. ही बौद्धांची आचारसंहिता आहे.
१५) बौध्द व्यक्तीनी एकमेकांना जय भीम करताना दोन्ही हात आदराने जोडावे. स्वागत करावे. ही बौद्धांची आचारसंहिता आहे.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील समाज निर्माण होईल आणि इतर समाजाचे लोक आपल्या समाजाकडे प्रबुद्ध समाज या दृष्टीने पाहतील, आपले आचार, विचार आणि संस्कार उत्तम ठेवणे ही आपली आचारसंहिता आहे.
नमोबुद्धाय ! सविनय जयभिम !!
आपला धम्मबंधू
आयु. राज जाधव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत