निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

मतदान नव्हे मताधिकार

अशोक सवाई.

आपल्या देशात दरवर्षी कुठे ना कुठे निवडणुका होत असतात. त्या ग्रामपंचायती पासून तर देशाची सर्वोच्च संविधानिक संसद असलेल्या लोकसभा व लोकसभेच्या पोटनिवडणूकी पर्यंत. लोकसभेची निवडणूक ही देशातील लोकशाहीचा मोठा उत्सव मानला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (इव्हीएम) आल्यापासून काही पक्षांद्वारे रडीचा डाव खेळला जावू लागला. अलिकडच्या काळात त्याचे प्रमाण फारच वाढले. यामुळे मतदारांच्या मतांच्या मूल्यांचे हनन होत चालले आहे. हे निकोप लोकशाहीच्या सुदृढतेसाठी निश्चितच चांगले आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. मतांचे मूल्य काय असते हे अमेरिका हा सर्वात जुन्या लोकशाहीचा देश आहे असा टेंभा मिरवणाऱ्या अमेरिकेला सुद्धा विचारायला पाहिजे की तुमच्याच अमेरिकेतील महिलांना मताधिकाराचा हक्क नव्हता तो त्यांनी तिथल्या व्यवस्थेशी झगडून आपल्या मतांचा अधिकर प्राप्त करून घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व जागतिक घडामोडींचा व त्या त्या देशांच्या घटनेचा अभ्यास करूनच त्यांनी आपल्या देशाची सर्व समावेशक सुंदर घटना लिहली. म्हणूनच विदेशातील अभ्यासक आपल्या घटनेची म्हणजेच संविधानाची प्रशंसा करताना दिसतात. एवढेच नाही तर त्यांच्या त्यांच्या शैक्षणिक संस्थानांच्या लायब्ररी मध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी भारतीय संविधानाचा ग्रंथ ठेवला आहे. ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे.

घटना लिहीताना डाॅ. बाबासाहेबांनी किती कष्ट घेतले याची कल्पना आजच्या पिढीला कदाचित नसेल. बाबा स्वतः पहिले कागदावर घटनेचा कच्चा मसुदा लिहून काढत. यासाठी ते उशीरा पर्यंत जागत असत. जेवणावरही त्यांचं लक्ष राहात नसे. इतके ते कामात मग्न होत असत. नंतर ते टायपिस्ट ला टाईप करायला सांगत. टायपिंग झाल्यावर ते पुन्हा तपासून घेत. त्यानंतर आपले विश्वासू सहकारी नानकचंद रत्तूंना सांगून सायक्लोस्टाईल करून ( तेव्हा झेरॉक्स मशीनचा जन्म झाला नव्हता) त्यांना हव्या तेवढ्या प्रति काढून घेत. नानकचंद रत्तूंना सुद्धा यातील एकही पेपर
हरवू नकोस. असे बजावून ठेवत. बरं ते कच्च्या मसूद्याच्या सर्वच प्रति एका ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत असत. (तो दस्तऐवज केंद्र सरकारच्या विधिखात्याकडे आहे की अजून कुठे आहे किंवा सुरक्षित आहे किंवा नाही याची माहिती नाही) आणि नंतर ते या मसुद्यावर संविधान सभेत चर्चा घडवून आणत. तेव्हा संविधान सभेतील सदस्य देखील उच्च शिक्षित व विद्वान होते. मसुद्यावर प्रत्येक सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बाबा आपल्या प्रखर विद्वत्तेचा जोरावर तर्कशुद्ध उत्तरे देवून त्या सदस्यांचे समाधान झाल्यावर ते संविधान सभेकडून पास करून घेत. आणि त्यानंतर ते पुन्हा आपल्या पुढच्या कलमांच्या तयारीला लागत असत. त्यांच्या या दगदगीमुळे त्यांची प्रकृती तक्रार करत असे. पण बाबा त्या तक्रारींची बिलकुल दखल घेत नसत. एवढ्या कष्टाने त्यांनी राज्य घटना किंवा संविधान तयार केले. कठोर कर्तव्यदक्ष बाबांच्या निगराणीत आपले संविधान तावून सुलाखून निघाले आहे. व त्यानंतरच ते स्वतंत्र भारताच्या पहिल्या राष्ट्रपती कडे भारतीय संविधान सोपवून भारताला अर्पण केले.

            इथे एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो तो म्हणजे जेव्हा भारतीय नागरिकाचे २१ वर्षे वय पूर्ण झाल्यावर म्हणजे प्रौढ असलेले सर्व भारतीय स्त्री-पुरुषांना बाबासाहेबांनी घटनेत  निवडणुकीत मत देण्याचा अधिकार दिला. तेव्हा संविधान सभेचे सदस्य असलेले श्री. राजगोपालाचारी बाबासाहेबांना म्हणाले. *डॉ. आंबेडकर इस राज्यघटना में आपने अपने अनपढ और नासमझ लोगोंको मत देनेका अधिकार दिया यह तो ठिक है, लेकिन जब हम तुम्हारे अनपढ और नासमझ लोगोंसे उनके वोट खरीदेंगे तब तुम क्या करोगे?* 

बाबासाहब जी ने तुरंत उत्तर दिया, हां आप ठिक कह रहे है की, हमारा समाज अनपढ़ है, नासमझ है, गरीब है, लेकिन जब हमारा समाज पढ़ लिखकर समझदार होगा और मतों का मूल्य समझने लगेगा तब तुम्हारे लोग हमारे लोगोंसे मतों की भीक मागेंगे और तब तुम्हारे लोगों जैसे दुसरे भिकारी नही होंगे। तर तरूणांनो हा इतिहास वाचा. बाबांचा व देशाचा इतिहास वाचताना तुमच्या अंगावर काटे उभे राहतील. सोबतच इतर चौफेर वाचन केल्यास तुमच्या सारखे वैचारीक दृष्टीने गर्भश्रीमंत दुसरे कुणी नसणार. तसेच वाचन हे ‘शैक्षणिक वरदान’ आहे हेही लक्षात घ्या. असो.

            मायबाप वाचक हो बाबांनी या संविधानात भारतीय जनतेला तमाम हक्क अधिकार देवून ठेवले आहेत. त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा अधिकार दिला तो म्हणजे मताधिकाराचा. (आज त्या मताधिकाराचे 'मतदान' करून ठेवले) हा अधिकार मिळवण्यासाठी एससी, एसटी, ओबीसी व मायनाॅरिटीज व खास करून महिला वर्ग यांना  कोणताही संघर्ष, आंदोलने, किंवा कोर्ट कचेऱ्या न करता आयता मताधिकार बहाल करण्यात आला. इतर देशातील महिलांना या मताधिकारासाठी कडवा संघर्ष करावा लागला. म्हणूनच तिथल्या महिला मताधिकाराचा हक्क किती महत्त्वाचा आहे, त्या अधिकाराची काय किंमत आहे हे त्या महिला जाणून आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी या मताधिकाराचा  मोफत दिलेल्या हक्काचे आपल्याला किती मोल आहे हे आपण जाणतोच. 

            मतदान म्हणजे दान द्या अन् विसरून जा. दानाचा काहीही हिसाब किताब नसतो. भक्त मंडळी मंदिरात गेल्यावर ते जे त्यांच्या इच्छा शक्ती नुसार किंवा ऐपतीप्रमाणे दान पेटीत दान टाकतात. त्याचा हिशोब घेणारा देत नाही अन् देणारा विचारत नाही. त्याचे ऑडिटही होत नाही, त्यामुळे मंदिरात खोऱ्याने ओढण्या इतके धन जमा होते (त्याचे व्हिडिओ वेळोवेळी प्रसारित होत असतात) त्यात सोने, चांदी, हिरे मोती, रुपये पैसे तर असतेच शिवाय धन्नासेठ अगदी प्लॅटिनम सारख्या अती मौल्यवान धातूचे दागिने सुद्धा देवासाठी दान करतात. हे सार धन बिनबोभाट त्या त्या मंदिराच्या पुजाऱ्याकडे जाते. ते धन देशातील सर्व मंदिराचे मिळून इतके भरमसाठ असते की, देशाच्या वार्षिक बजेट पेक्षा चार पाच पटीने जास्त असते. म्हणून मताधिकाराला मतदान म्हणू नये. मतदान हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. 

            मताधिकार हा संविधानाने मतदाराला दिलेला संविधानिक अधिकार आहे. तो अधिकार मतदाराने बजावला पाहिजे. नाही बजावला तर संसदेत किंवा विधानसभेत निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींवर टिका टिपणी किंवा विरोध/समर्थन करण्याचा त्या मतदाराला नैतिक अधिकार राहत नाही. किंवा तो त्याच्या कामाचा हिशोब किंवा जाब विचारू शकत नाही. मतदाराने मताधिकार बजावला की निवडून आलेल्या  लोकप्रतिनिधीला लोकांना त्याच्या कामाचा उजळ माथ्याने हिशोब किंवा जाब विचारण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो. ज्याला तो प्राप्त होतो त्यालाच त्याचा तो मताधिकार म्हटले जाते. वृत्तसंस्था/वृतपत्रांनी हे लक्षात घेऊन आपापल्या वृत्तपत्रातून मताधिकार शब्दाचा प्रचार प्रसार करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच मतदारांनी सुद्धा मतदान न म्हणता मताधिकार या शब्दाचा वारंवार प्रयोग करायला पाहिजे नव्हे ही मतदार तसेच वृत्तसंस्था व वृतपत्रांची मुख्य व महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यातून अनभिज्ञ मतदार जागृत होवून त्यांना त्यांच्या मताधिकाराचे महत्त्व कळेल. आणि योग्य त्या ठिकाणी आपल्या मताधिकाराचा वापर करून योग्य प्रतिनिधी संसदेत/विधानसभेत किंवा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थानात निवडून जातील. त्यामुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होवून देशही मजबूत होईल. व जनतेच्या मजबूत हातात देश सुरक्षित राहील. नाही तर लोकं (मत) दान देत राहतील ते घेत राहतील कामाचा हिसाब किताब ठण ठण गोपाळ... येत्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा थोडक्यात उहापोह आहे. 

अशोक सवाई.
91 5617 0699

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!