भाजपप्रमाणे काँग्रेस आरक्षण कासंपवत आहे ते आधी उत्तर द्या!
अकोल्यातील नागरिकांनी विचारले महत्वाचे प्रश्न
अकोला : अकोला शहरात महाराष्ट्र डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि भारत जोडो अभियान अकोला जिल्ह्याच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये योगेंद्र यादव आणि उल्का महाजन उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न उपस्थित करून भाजपप्रमाणेच काँग्रेस आरक्षण संपवत आहे का नाही, याचे आधी उत्तर द्या, असे विचारले. त्यावर योगेंद्र यादव आणि उल्का महाजन यांची बोलती बंद करण्याचे काम अकोल्यातील जनतेने केले आहे.
जवळपास 200 नागरिकांनी योगेंद्र यादव आणि उल्का महाजन यांना प्रश्न विचारून उत्तर देण्याची विनंती केली. मात्र, दोघानाही निरुत्तर व्हावे लागले.
अकोल्यातील बौध्द, दलित, आदिवासी, मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी खूप महत्वपूर्ण प्रश्न विचारले. एप्रिलमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत योगेंद्र यादव आणि उल्का महाजन यांनी भाजपच्या विरोधात काँग्रेसला मत द्या असे म्हटले होते पण निवडणुका संपल्यावर काँग्रेस सुद्धा भाजपप्रमाणे आरक्षणविरोधी पावले उचलत आहेत, हे तुम्हाला योग्य वाटते का? असा सवालही या कार्यक्रमात विचारण्यात आला.
बौध्द, दलित, आदिवासी, मुस्लिम समाजाने विचारलेले प्रश्न :
- काँग्रेस आणि महाविकास आघाडीने लोकसभेत मुस्लिमांना उमेदवारी का दिली नाही?
- काँग्रेस आणि महाविकास आघाडीने विधानपरिषद निवडणुकीत मुस्लिमांना प्रतिनिधित्व का दिले नाही?
- काँग्रेस मुस्लिमांना विधानसभेत किती प्रतिनिधित्व देणार आहे?
- लोकसभेत वक्फ विधेयकावरील चर्चेला राहुल गांधी का अनुपस्थित होते?
- भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने आमची मते घेतली, मग महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या 8-12 आमदारांनी महायुतीला क्रॉस व्होटीग का केले?
- अलीकडेच राहुल गांधी कोल्हापुरात होते पण त्यांनी विशाळगड दर्गा प्रकरण आणि दंगलीवर एक शब्दही उच्चारला नाही? राहुल गांधींनी दंगलग्रस्त मुस्लिमांची भेट घेण्याची तसदी घेतली नाही. का?
- अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण संपवण्याच्या हेतूने काँग्रेस आणि भाजप सारखेच का दिसत आहेत?
- अनुसूचित जातींमध्ये क्रिमीलेयर आणि उपवर्गीकरणाला काँग्रेसचे समर्थन का आहे? भाजपसारख्या काँग्रेसला अनुसूचित जाती जमातीत फूट का पाडायची आहे?
९. मराठ्यांना ओबीसींतून आरक्षण मिळावे या जरांगे पाटील यांच्या मागणीला काँग्रेसचे मित्रपक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला. राहुल गांधी याचे समर्थन करतात का? यावर काँग्रेसची भूमिका काय?
काँग्रेसने भाजपला पराभूत करण्यासाठी बौद्ध, दलित, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी यांची मते घेतली मात्र भाजपचे काम काँग्रेस करत आहे.
यातील कोणत्याही प्रश्नाचे समर्पक उत्तर देऊ न शकलेल्या महाराष्ट्र डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि भारत जोडी अभियानाच्या लोकांनी प्रश्न विचारणाऱ्या लोकांनाच गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याच प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नसल्याने योगेंद्र यादव आणि उल्का महाजन यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. ज्या बौध्द, दलित, आदिवासी, मुस्लिमांवर हल्ला करण्यात आला. हे नागरिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेल्याची माहिती मिळत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत