श्रीमती भागुबाई चेंडगे यांचे दुःखद निधन
पिंपळनेर (प्रतिनिधी) – कै. भागुबाई कुंडलिक चेंडगे रा. कोळगांव ता.करमाळा जि.सोलापुर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अत्यंत कष्टाळू तसेच सोशिक असणाऱ्या भागू आईच्या निधनाने सर्वत्र शोककाळा पसरली आहे त्यांचे पश्चात सहा भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नात, नातु नातजावई, नातसुन, नातवंडे, पतवंडे असा परीवार आहे. रेल्वे बँकेच्या मा संचालिका राजूबाई तळेकर तसेच सेवानिवृत्त वनक्षेत्रपाल दगडू पुंडलिक चेंडगे व हरीश कुंडलिक चेंडगे यांच्या मातोश्री होत्या. व से.नि.प्राचार्य एस.डी पाटील यांचे जावई ओरीसा येथील बीपीसीएलचे मॅनेजर डॉ. प्रवीण चेंडगे यांच्या आजी होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत