शिवरायांच्या पुतळ्याचे चार ऑक्टोबरला सांगलीत अनावरण
सांगली दि. १९ (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावरील पुतळ्याचे अनावरण दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा येथील मराठा संस्थेत होणार आहे 18 पगड जातीचा नेत्यांना निमंत्रित केले आहे. नरवीर तानाजी मालुसरे, स्वराज्याचे पाईक बहरजी नाईक, वीर शिवा काशिद यांचाही सन्मानही करण्यात येणार आहे .अशी माहिती स्वागताध्यक्ष माजी खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद दिली. ते म्हणाले कि बहुजन समाज उन्नती हे ध्येय समोर ठेवून मराठा समाज संस्थेचे गेले 75 वर्षे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले. सध्या मात्र समाज जाती जातीत विभागत आहेत. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण सर्व समाज घटकांनी अंगीकारणे गरजेचे आहे पुतळा अनावरणाच्या निमित्ताने सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र येण्याच्या संदेश दिला जात आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याच्या अनावरण होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार उदयनराजे भोसले खासदार शाहू महाराज आमदार शिवेंद्रराजे भोसले माजी खासदार संभाजी राजे,प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांना निमंत्रण दिले आहे. केळकर महाराज कोटणीस महाराज झेंडे महाराज तसेच इंद्रजीत देशमुख यांना निमंत्रित केले आहे कुस्ती मधील योगदानाबद्दल बाबाजी मोरे यांना भीम ज्योती रामदादा सरवडेकर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. शरद कराळे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील, विकास मोहिते, विक्रम पाटील ,सरवडेकर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत