भारतीय विद्यार्थी मोर्चा चे जिल्हा स्तरीय प्रशिक्षण शिबीर संपन्न.
दिनांक ७ जुलै ( पुणे) जिल्हा प्रतिनिधी _ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे स्टेशन कॉन्फरन्स हॉल मध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चा ,चे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन मंगेश पोटे ( अध्यक्ष, बामसेफ पुणे जिल्हा) यांनी केले . यावेळी बोलताना प्रशिक्षक किरण साळवी सर यांनी भारतातील बहुजन समाजाचे शिक्षण संपविण्याचा कट नवीन शैक्षणिक धोरणातून केले जात आहे. ज्या मनुस्मृतीने बहुजन समाजातील अठरा पगड जातींच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता ती मनुस्मृती आरएसएस प्रणित भाजपा सरकार ने नव्या शैक्षणिक धोरणातून लागू केली आहे . स्कूल कम्लेक्स च्या नावाखाली सरकारी शाळा महाविद्यालये खाजगी कार्पोरेट कंपन्यांकडे चालविण्यात दिल्या जाणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात शिक्षण संपविण्याचा कट रचला गेला आहे मराठा, धनगर, माळी ,साळी, कोष्टी, वंजारी , महार, मांग ढोर, चांभार, आदिवासी या सारख्या समाज घटकांना येणाऱ्या काळात शिक्षनापासून वंचित ठेवण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्या विरोधात समाज जागृती करण्यासाठी विद्यार्थी, मोर्चाने पुढाकार घेतला पाहिजे. असे प्रतिपादन त्यांनी केले.
ज्यांना शिक्षण घेता चयेणार नाही त्यांना रोजगार, नोकरी मिळणार नाही, नोकरी नाही तर उत्पन्न नाही त्यामुळे गुलामीत जीवन जगण्यास भाग पाडावे लागेल . शेतकरी, कामगार, मजूर, महिला, विद्यार्थी, या सारख्या समाज घटकांना एकत्र करून राष्ट्रीय पातळीवर जन आंदोलन उभे करणे ही काळाची गरज आहे . आपण सर्वांनी या राष्ट्रव्यापी आंदोलनाला साथ सहयोग करावा असे आवाहन त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी मोर्चाचे अरिहंत गायकवाड यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत