कायदे विषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

भारतीय संविधान कसे व कधी निर्माण झाले.

संविधान म्हणजे काय?

संविधान निर्मितीचा इतिहास.

अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक सिडको, नांदेड.

संविधान म्हणजे समाजात प्रत्येकांनी प्रत्येकाशी कसे राहयाचे, कसं वागायचं? ही नियमावली तयार करुन त्याची अंमलबजावणी करणे. मानव हा सुरुवातीपासूनच समूहात, कुटुंबात राहणारा प्राणी आहे, म्हणून त्याला समाजशील प्राणी म्हणतात. समाजात वेगवेगळ्या प्रकारचे जसे की विविध धर्माचे, पंथाचे, जातीचे तसेच मित्रपरिवार, नातेवाईक राहत असल्याने प्रत्येकाशी कसे वागावे कारण समाजात राहत असल्याने प्रत्येकाशी ओळख होते, दैनंदिन गरजा भागविण्यासाठी एकमेकांशी मदत होते, यामधूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, सुरक्षिततेची भावना निर्माण होते, एकमेकांना आधार मिळतो हे जरी असले तरी कधी कधी वेगवेगळ्या स्वभावामुळे वाद, भांडणे होतात, तणाव वाढला जातो, हा तणाव नियंत्रित ठेवण्यासाठी, समाज जीवन सुरळीत ठेवण्यासाठी अनुभवी, जाणकार लोकांकडून समाज समूह शांत राहण्यासाठी जे नियम केले जातात त्याला त्या समाजांचे संविधान म्हणतात. बदलत्या परिस्थितीनुसार समूहाचा विस्तार होऊन गाव, तालुका, जिल्हा, राज्य,देश निर्माण झाले, यांच्यातील संबंध, व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी नियम तयार करणे, समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी जी शासनव्यवस्था असते तिला काही विशेष अधिकार असतात, राज्य,देश यामध्ये राहणार नागरिकांचे स्वातंत्र्य, हक्क, अधिकार याविषयीची जवाबदारी पार पाडण्यासाठी त्या त्या शासनव्यवस्थेची एक नियमावली असते ही व्यवस्था राबवताना त्रासदायक व अनियंत्रित होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे असते हे सर्व बाजू तपासून देशातील हुशार लोक एकत्रितपणे येवून जी नियमावली तयार करतात,त्या नियमावलीला मान्यता मिळवली जाते अशा त्या त्या देशाच्या एकत्रित नियमावलीला संविधान असे म्हणतात.
संविधान हे देशातील कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ निर्माण करुन यामध्ये त्यांचे अधिकार, कर्तव्ये सांगितली जातात,या तीनही मंडळाचे परस्पर संबंध तसेच या सर्वांचं जनतेशी संबंध कसे असावे याचे नियम असतात. संविधान म्हणजे संविधान निर्मात्याचा आदर्श, स्वप्न, आणि मूल्यांचा आरसा असतो, गरजेनुसार व परिस्थितीनुसार संविधानातील कायद्यात बदल करणे परंतु हा बदल करताना संविधानातील मुळ कायद्याला अनुरूप ते कायदे असावेत. म्हणूनच संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो.
भारतीय संविधान कधी व कसे निर्माण झाले.


संविधान हा कोणत्याही देशाचा एक महत्त्वपूर्ण व कायदेशीर दस्तऐवज असतो, संविधान तयार होत असताना अनेक संघर्ष, संकटाला सामोरे जावे लागते आपल्याही देशाच्या संविधानाला वेगवेगळ्या समस्यांना, संकटाला सामोरे जावे लागले. ब्रिटिश काळात व पुर्वी भारत लोकशाही देश नव्हता, ब्रिटिशांच्या अगोदर भारतात राजे, सुलतान, बादशहा , संस्थानिक यांचें राज्य होते,हे सर्व आपल्या मनाने राज्य कारभार चालवत होती, या लोकांचा कारभार पुरोहित सांभाळत असत यामुळे तत्कालीन समाजव्यवस्थेवर रुढी, परंपरा, धर्म यांचा प्रभाव होता, यामुळे लोकशाहीचे मूल्य समाजात कशी रुजली गेली याचा मोठा इतिहास आहे,हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन भागात अभ्यास करावा लागेल. एक म्हणजे १८५८ च्या अगोदरच तर दुसरा भाग १८५८ च्या नंतरचा.
 संविधान निर्मितीचा इतिहास

भारतात इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि सत्ताधारी झाले, इंग्लंड मध्ये राजेशाही असली तरी ती नामधारी होती तेथील कारभार लोकशाही पद्धतीने चालत असे, भारतात सत्ताधारी झालेल्या इंग्रज येथील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये विविध कायदे बनवून भारतात लागू केले. यासाठी त्यांनी पहिला कायदा १७७३ मध्ये रेग्युलेटीग अक्ट बनवला,हा कायदा भारतीय संविधान तयार करण्याची पहिली पायरी आहे.
यानंतर अनेक कायदे केले.
१७७४- सुप्रीम कोर्ट ऑफ कलकत्ता
१७८४- पिटस इंडिया अक्ट.
१७८६- डिकलेरेशन अक्ट.
१८१३- चार्टर अक्ट – या कायद्यात भारतीयांना इंग्रजी मधून शिक्षण निर्णय घेण्यात आला.
१८३३- सनदी कायदा. या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला संपूर्ण भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून घोषित केले
१८५३- हा नवीन सनदी कायदा बनवला . या कायद्यानुसार सनदी अधिकारीसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीयांना परवानगी देण्यात आली.
१८५७ चा उठावा नंतर नवीन कायदे बनवले.
१८६१- भारत परिषद कायदा,या कायद्यानुसार प्रशासनाची चौकट कसं करावं यावर भर देण्यात आला.
१८९२- दुसरा भारत परिषद कायदा. या कायद्यानुसार कार्यकारिणी परिषदेत पाच भारतीयांना सहभागी करून घेण्याची तरतूद करण्यात आली.
१८८५ मध्ये राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना तर १९०६ मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. भारताचा राष्ट्रवाद फोडण्यासाठी १९०९ लाख मार्ले- मिंटो सुधारणा कायदा बनविला, या कायद्यानुसार प्रांतीय निवडणूकीत मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले यामुळे फाळणीचे बीज रोवण्याच कार्य या कायद्याने केले.
१९१९ ला मॉटेगयू- जेम्सफरड कायदा झाला.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधानाकडे आगेकूच करणारा म्हणजे भारत सरकार कायदा १९३५ होय. या कायद्यानुसार भारताच्या प्रांतातील सर्व खात्याचा कारभार भारतीय प्रतिनिधीला देण्यात आला. या कायद्यानुसार भारतीय स्व- शासनाचा पाया रचला गेला. या कायद्यात ३२१ अनुच्छेद व १० परिशिष्ट होती. भारतीय संविधानात या कायद्याची बरेच नियम आहेत.
यानंतर संविधान सभेचा इतिहास व संविधानसभेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर कसे निवडून गेले हे बघूया.
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक सिडको नांदेड.
????????????????????????????????????????????????????????????????????????????????

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!