एक अकेला मोदी-शाह पर भारी
अंध भक्तांच्या डोळ्यात अंजन घालणारा जबरदस्त अग्रलेख सामना अग्रलेख :
♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितशहा, राजनाथसिंह, किरेन रिजिजू, रविशंकर प्रसाद, भूपेंद्र यादव हे एका बाजूला व दुसऱ्या बाजूला ‘एकअकेला’ राहुल गांधी या सगळ्यावर भारी पडले. मोदी-शहांचा अहंकार संसदेत चूर करण्याचे काम गांधी यांनी केले . ईडी, सीबीआयचा दुरुपयोग करून संपूर्ण विरोधी पक्षाला मोदी – शहा घाबरवत राहिले. आता विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना रोखा, त्यांच्यापासून संरक्षण द्या, अशी याचिका लोकसभा अध्यक्षांकडे करण्याची वेळ या अहंकाऱ्यांवर आली. काळाने घेतलेला हा सूड आहे. मोदी-शहांना यापेक्षा वाईट दिवस भविष्यात पाहावे लागणार आहेत . गांधी यांना थांबवणे आता सोपे नाही . ईडी , सीबीआयला हा संदेश एव्हाना गेलाच असेल!
भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा आणि हिंदूंचा ठेका घेतलेला नाही, असा जोरदार हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. भर संसदेत मोदी, शहा व त्यांच्या भाजपचा मुखवटा गांधी यांनी ओरबाडून काढला व एकच गोंधळ झाला. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागण्याची वेळ अमित शहांवर आली. याबद्दल गांधी यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना राहुल गांधी यांनी मोदी यांच्या देवत्वाचा शेंदूर खरवडून काढला. राहुल गांधी यांनी सांगितले, ”हे लोक हिंदुत्वाच्या नावावर दंगली घडवत आहेत. मत्सर, द्वेष पसरवत आहेत. खरे हिंदुत्व संयमी आणि सत्याची कास निर्भयपणे धरणारे आहे.” यावर पंतप्रधान मोदी हे तगमगत उठले व गांधी हे हिंदू समाजाचा अपमान करीत असल्याचे बोलले. यावर गांधी यांनी ताडकन उत्तर दिले, ”महाशय, तुम्हाला हिंदुत्व कळलेच नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही.” यावर मोदी यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. मोदी-शहांच्या मैदानात शिरून त्यांना अशा पद्धतीने कोणीच सुनावले नव्हते. दहशत व पाशवी बहुमताच्या बळावर या जोडगोळीने संसद आपल्या टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न केला, पण गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत विरोधी पक्ष लोकसभेत अवतरताच हिंदुत्वाच्या नावावर मनमानी करणाऱ्यांचा टांगा पलटी झाला आहे. मोदी व शहा यांनी धर्माच्या नावावर लोकांना दहा वर्षे खेळवत व भांडत ठेवले. गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला
यांनाही आरसा
दाखवला. ”विरोधी पक्षनेते म्हणून मी तुमच्याशी हस्तांदोलन केले, तेव्हा तुम्ही भलत्याच ताठ कण्याने उभे होता, पण मोदींशी हात मिळवताना तुम्ही सपशेल वाकलात. म्हणजे लोकशाहीच वाकली असे म्हणावे लागेल.” गांधी यांच्या हल्ल्यामुळे संसदेतील प्रतिष्ठित चमचे व अंधभक्त उताणेच पडले. एकाच फटक्यात शंभरावर खासदारांचे निलंबन करून मोकळय़ा सभागृहात महत्त्वाचे कायदे मंजूर करून घेणाऱ्या लोकसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेत्याने जे खडे बोल सुनावले, त्यामुळे गेली दहा वर्षे मरगळलेल्या संसदेच्या भिंतींनाही जाग आली. ‘आपण बायोलॉजिकल नसून परमेश्वराचे पुत्र आहोत. आपला थेट संवाद परमेश्वराशी आहे’, असे मोदी सांगतात. गांधी यांनी या अवताराची चांगलीच खिल्ली उडवली. ते म्हणाले की, ‘मोदीजी, नोटाबंदी करण्याचा संदेश थेट वरून देवाकडून आला काय? मुंबई विमानतळ अदानी यांना देण्यासाठीसुद्धा वरूनच ऑर्डर आली असेल खटाखट खटाखट.’ यावर मोदी-शहांना लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागण्याशिवाय पर्याय राहिला नाही. संसदेत नरेंद्र मोदी हे स्वतःच्या कर्माने चेष्टेचा विषय झाले. मोदी हे जोडतोड करून पंतप्रधान झाले असले तरी त्यांच्या नेतृत्वास उतरती कळा लागली आहे. गांधी यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, ”मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढायची होती. त्यांनी तीन कंपन्यांना सर्व्हेचे काम दिले. तिघांनीही मोदींना निर्णय दिला की, मोदीजी तुम्ही रामाच्या वाटेला जाऊ नका. अयोध्येतील जनता हरवेल. तेव्हा मोदी पुन्हा वाराणसीत गेले व कसेबसे जिंकले!” मोदी यांच्या तोंडावर
इतकी फजिती
कोणीच केली नसेल. मोदी यांचे हिंदुत्व हे नफरत आणि हिंसा फैलावणारे आहे. हिंदू-मुसलमानांत भांडणे लावणारे आहे, पण पंतप्रधान मोदी एकदाही हिंसाचारग्रस्त मणिपुरात गेले नाहीत. भाजप भय आणि द्वेषाचे विष पसरवतो. हा राष्ट्रवाद नाही आणि हिंदुत्व तर नाहीच. हिंदुत्व हे संस्कारी आणि सुसंस्कृत आहे. हा संस्कार भाजपमध्ये नाही. मोदी यांना निवडणूक प्रचारात ‘मुजरा’ आठवला. मुसलमान तुमच्या बायकांच्या गळय़ातील मंगळसूत्रे खेचतील. तुमच्याच दारात दोन म्हशी असतील तर एक म्हैस घेऊन जातील, अशी उटपटांग भाषणे करूनही मोदी यांना हिंदूंची मते मिळाली नाहीत. …
[7:38 PM, 7/6/2024] Dr. D.S.Sawant: निवेदिता सराफ काकु. अक्कल अक्कलकोटला नेऊन ठेवलीय का?
तुम्ही तुमच्या स्वामींवर श्रद्धा ठेवा अथवा स्पायडरमॅनवर. तुमचा तो संविधानिक अधिकार आहे. परंतु गाडगे महाराजांचं नाव घेण्याआधी जरा विचार करत चला.
स्वामींचं चरित्र वाचून भारावून गेलात? नेमकं काय वाचून भारावून गेलात? मुंगीपैठणच्या विठाबाईची गोष्ट वाचून भारावून गेलात का?
गाडगे महाराजांशी तुलना कशावरून?
गाडगे महाराज अंगभर कपडे नेसायचे. ते फाटके तुटके असले तरी स्वच्छ असायचे.
गाडगे महाराज लोकांच्या चुलीत हागत नव्हते अन कुणाच्या विहिरीत मुतत नव्हते. उलट ते गावोगावी फिरून स्वच्छता करण्यासाठी झाडू मारायचे. लोकांनाही स्वच्छतेचं महत्व पटवून द्यायचे.
गाडगे महाराज लोकांना बुवाबाजी चमत्कार जादूटोणा अंधश्रद्धेपासून परावृत्त करायचे. किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत गावोगावी फिरायचे.
गाडगे बाबा दीन-दुबळ्या आजारी गरि…
[7:40 PM, 7/6/2024] Dr. D.S.Sawant: खोटे बोला, रेकून बोला
- “लोकसभेतील भाषणात पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेले विधान चुकीचे “* “काँग्रेसच्या दलित विरोधी धोरणामुळेच डॉ.आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता”. हे पंतप्रधानांनी काल लोकसभेच्या भाषणांतून केलेले विधान असत्य आहे.
खरे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.त्यामागे काँग्रेसची दलित विरोधी भूमिका हे कारण नव्हते.तर त्यामागे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे संसदेत”हिंदू कोड बील” पारीत न करणे होय.हे हिंदू कोड बिल पारित होऊ नये यासाठी तत्कालीन हिंदुत्ववादी लोकांनी आणि हिंदू स्त्रियांनी मोर्चे काढून आंबेडकरांना मानसिक त्रास दिला होता. खरे तर हे हिंदू कोड बील समग्र हिंदू स्त्रियांच्या मानवी हक्काचे व उत्थानाचे बील होते. हे पंतप्रधानांना माहित नाही.?
डॉ.बाबासाहेब…
[7:42 PM, 7/6/2024] Dr. D.S.Sawant: कुठल्याही हुकुमशाही राजवटीला आपल्या जनतेला भुलवायला आणि पाठिंबा द्यायला एक शत्रु दाखवावा लागतो.
आपल्या वाईटाला, आपला सुवर्णकाळ मातीत जायला हा शत्रूच कारणीभूत आहे अशी ठाम समजूत करून दिली जाते.
भारतात जे काही वाईट घडलेलं आहे त्याला मुस्लीम जबाबदार आहेत आणि हा देश सोनेकी चिडिया होता त्याची बरबादी व्हायला इस्लाम कारणीभूत आहे हे आपल्याला पटवून दिलेलं आहे.
आता आधुनिक काळात या प्रचाराची पुढची पातळी भारतातल्या मुस्लिमांची संख्या वाढून हिंदू खतरेमे येतील हि लोणकढी थाप मारली जाते.
सांख्यिकी आकडेवारीने या दाव्यातला फोलपणा कळून येईलही.
पण मुळात भारतातल्या हिंदुनी तत्कालीन काळात इस्लाम का स्विकारला हा कळीचा मुद्दा उरतोच.
धर्मांतर दोन प्रकारे होत होत.
एक म्हणजे तलवारीच्या धाकाने आणि दुसर लाभांच्या, अधिकारांच्या, सवलतींच्या अपेक्षेने.
तलवारीच्या धाकाने धर्मांतर झाल अस म्हणाव तर हि इस्लाम मध्ये गेलेली मंडळी पुन्हा पवित्र वगैरे करून हिंदू धर्मात आणण्याची सोय नव्हती का ? अशी इनकमिंग ची सोय सोपी सुटसुटीत असती तर अनुकूल काळ आल्यावर हि मंडळी पुन्हा हिंदू होऊ शकत होती.अशी सोय उपलब्ध होती का ?
सन्मानाच्या , लाभांच्या, अधिकारपदांच्या , सवलती मिळतील, रोजगार मिळतील या अपेक्षेने स्वेच्छेने इस्लाम स्विकारलेली जनता साहजिकच भौतिक सुखांपुढे धर्म गौण मानणारी होती म्हणूनच धर्म सोडून गेली, किंवा त्यांच्या धर्मविषयक जाणीव, धर्माबद्दल असलेली आस्था आणि आपुलकी अतिशय विसविशीत होती, कमकुवत होती हाच निष्कर्ष निघतो ना ?
मुळात हिंदू धर्मात असलेली असमानता केवळ जन्माने तुम्ही कुठल्या जातीत, वर्णात जन्मलेले आहात त्यानुसार तुम्हाला समाजात मिळणारा सन्मान, तुमच स्थान ठरवणार असेल तर साहजिकच अस अपमानित करणारा धर्म कुणाला आपलासा वाटणार आहे ?
मग ज्याच्या विषयी आपलेपणाची भावना नाही तो धर्म कवटाळून बसण्यात अर्थ तरी काय आहे ?
हिंदू धर्मात असलेल्या त्रुटी दूर केल्या, तिथे समानता आली, सगळ्यांना समान हक्क मिळाले तर कोण कशाला धर्म सोडून जाईल हि साधी बाब आपल्याला कळत नाही आणि आपण हिंदुनी धर्म सोडला हेच तथ्य इस्लामने धर्मांतर घडवून आणले अस उलट पद्धतीने मांडून खापर फोडतो.
हिंदू धर्मातून धर्म त्यागून इतर धर्म स्विकारणे थांबवण्यासाठी हिंदू धर्मातल्या खालच्या वर्गाला सन्मानाने वागवण्याची गरज आहे हे विधानच मुळात गंडलेल आहे.
हिंदू धर्मात हा वरचा तो खालचा या उतरंडी नष्ट केल्या आणि सगळे एकाच पातळीवर समान झाले, समानता हा हिंदू धर्माचा गाभा झाला तर कुणाला सन्मानाने वागवण्याची गरजच भासणार नाही ना ? कुणाला तरी सन्मानाने वागवण्याची गरज आहे अस आपण म्हणतो त्यावेळी आपण वरच्या पायरीवर आहोत आणि कुणीतरी खालच्या पायरीवर आहे हे गृहीतक मान्य करतो ना ?
दुसरी बाब आणि कळीचा मुद्दा.
हिंदू खतरेमे है आणि हिंदू धर्मातून इतर धर्मात जाणाऱ्या लोकांना माघारी आणल पाहिजे किंवा थोपवल पाहिजे अस जे म्हणतात त्यांना बेसिक प्रश्न.
समजा हिंदू धर्मातून कधीकाळी एखाद्याचे आजे पणजे मुसलमान झाले असतील आणि आता त्यांना पुन्हा हिंदू होण्यासाठी तुम्ही तयार असलात तरी त्यांना परत हिंदू होऊन मिळणारी जात कोणती असेल ? त्यांना त्यांची पूर्वीची जात मिळेल कि प्रमोशन होऊन नवी जात मिळेल ?
हा प्रश्न विचारला कि हा धर्म धर्म खेळणारी मंडळी थातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारून नेतात.
या सगळ्या गोष्टींच सार फार सोप आहे.
हिंदू धर्माच्या उतरंडीत वरच्या वर्गात असलेल्या लोकांना खालच्या पायरीवर असणारी लोक फक्त आपले गुलाम आणि सोल्जर्स किंवा सेवेकरी म्हणून हवे आहेत.
हिंदू खतरेमे है च्या नावाखाली दंगलीत राडे करायला, गोरक्षक म्हणून केसेस अंगावर घ्यायला, प्रत्येक ठिकाणी हाणमार करायला हे सोल्जर्स हवे आहेत मात्र या सोल्जर्सला समानतेने वागवण्याची आमची तयारी नाहीये.
तुम्ही तुमच्या जन्मदत्त जातीनुसार तुमच्या पायरीनेच राहील पाहिजे आणि तुम्ही वैदिकांच्या पालखीचे भोई म्हणूनच जगल पाहिजे एवढाच सोपा अर्थ.
हि समानता जोवर हिंदू धर्म स्विकारत नाही तोवर हिंदू खतरेमे है या भंपकपणाला काहीही अर्थ नाही.
आनंद शितोळे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत