साद घालतो कबीर – प्राचार्य वसंत वावरे

समाजात काही दुष्ट, वाईट प्रवृत्तीचे लोक असतात. बरेचदा आपल्याला या लोकांचे वाईट अनुभव सुद्धा येतात. आपल्याला असंही वाटतं की हा आपल्यासोबत एकदा वाईट वागला आता कदाचित असं वागणार नाही. परंतु दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा सुद्धा त्याचे वाईट वागणे बदलत नाही.यांची कितीही वेळा परीक्षा घ्या पण अशी मंडळी आपलं वाईट आचरण काही सोडत नाही.
एकही बार परखिये
ना वा बारम्बार
बालू तो हू किरकिरी
जो छानै सौ बार
एखाद्याची पारखच करायची असेल तर फक्त एकदाच पारख करा आणि ठरवा तो कसा आहे ? त्याची वारंवार परीक्षा घेण्यात अर्थ नसतो. अहो!! वाळूला शंभरवेळा चाळणीतून गाळा तिचा किरकिर आवाज येणार म्हणजे येणार. तात्पर्य काय तर काही वाईट व दुष्ट प्रवृत्तीचे लोकं सुधारण्याच्या पलीकडे गेलेले असतात.ते त्यांचा स्वभाव काही सोडणार नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत