आगामी विधानसभेच्या निवडणुकीत १०० पत्रकार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
महादू पवार
पत्रकार मुंबई
9867906135
के रवी दादा यांचा अपक्ष पत्रकार उमेदवारांना पाठिंबा
मुंबई, आगामी विधानसभेच्या निवडणुका अवघ्या पाच ते सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असतानाघ सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणूक रणनीती आखली जात असतानाच आता पत्रकारही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. महाराष्ट्रातील किमान १०० विधानसभा निवडणुकीमध्ये पत्रकार, समाजसेवक, वरिष्ठ पत्रकार उमेदवारी दाखल करणार आहेत. या सर्वांना ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक के रवी दादा यांनी पाठबळ दिल्याने पत्रकार, समाजसेवक यांचा निवडणूक लढण्याबाबतचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे, अशी माहिती के रवी दादा यांच्या आतल्या गोटातून समजली आहे. पत्रकार आणि समाजसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने प्रस्थापित राजकीय पक्षांनाही एक मोठा धक्का मानला जात आहे.
समाजकारणामध्ये पत्रकार महत्वाची भूमिका वठवत असतो. समाजात पत्रकार हा जनजागृती आणि अन्यायाला वाचा फोडण्यास महत्वपूर्ण भूमिका निभावत असतो. परंतु पत्रकार सारखा समाजाचा गाढा अभ्यास असणाऱ्या घटकांना अथवा समाजसेवकांना प्रस्थापित राजकारणात कोणतेही स्थान मिळत नाही.
त्यामुळे पत्रकारांना व समाजसेवकांना राजकारणात आणण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार समाजसेवा के रवी दादा यांनी पुढाकार घेतल्याने राजकारणात एक वेगळे ट्विस्ट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या २८८पैकी १०० विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये महत्त्वाचे ज्येष्ठ पत्रकार समाजसेवक उमेदवारी दाखल करून समाजामध्ये आपली एक वेगळी राजकारणातली ओळख निर्माण करणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि महाराष्ट्रातील सामाजिक संघटनांचे पत्रकारांच्या नव्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. पत्रकार हा उत्तम राजकारणी असल्याचे आत्तापर्यंत लोकशाहीच्या राजकारणात सिद्ध झाले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पत्रकारांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरून नव भूमिका घेतल्यास राजकारणात पत्रकार, समाजसेवक हे दखलपात्र ठरतील, असे अभ्यासक जाणकार यांनी मत व्यक्त केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत