दिन विशेषनागपूरमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठविदर्भ

दिक्षाभूमी पार्कींगसाठी समाज कल्याणचा निधी !झालेला अनाठायी खर्चाची वसुली ट्रस्टी आणि नागपुर सुधार प्रन्यास कडून करण्यात यावी – राजेन्द्र पातोडे.

तीन मजली मॉल किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स सारखी रचना असलेली पार्किंग बांधकाम करण्याचा कुटील डाव दीक्षाभूमी ट्रस्टने रचला होता तो काल बहादुर आंबेडकरी अनुयायी ह्यांनी उधळून लावला त्या बद्दल सर्व सजग आंबेडकरी समूहाचे त्रिवार अभिनंदन.


काल पवित्र दीक्षाभूमी वर झालेल्या उग्र आंदोलन ह्यामुळे सरकार बॅक फुटवर गेले आहे.सुरू असलेला पार्किंग लॉटचे कामाला स्थगिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात अत्यंत मह्त्वाची माहिती देखील दिली आहे.त्यांनी सांगीतले की, ट्रस्टने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आवश्यक निधीसह राज्य सरकारने मंजुरी दिली होती.अर्थात बोगस ट्रस्टी राजेंद्र गवई आणि सहकारी त्यांचा प्रस्तावित कामांशी संबंध नसल्याचा करीत असलेला दावा खोटा ठरला आहे.हे कमर्शिअल बिल्डिंग सर्व ट्रस्टी आणि नागपुर सुधार प्रन्यास आणि भाजपाई ह्यांचे संगनमताने समाज कल्याण विभागाच्या निधीवर डल्ला मारण्यासाठी केलेले षडयंत्र आता उघडकीस आले आहे.
त्याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे दीक्षाभूमी पुनर्विकास प्रकल्प साठी समाज कल्याण विभागाचा निधी वळता करण्यात आला आहे! हयात भाजप – संघ आणि ट्रस्ट ह्यांची मिलीभगत असून त्याचा पुरावा म्हणजे दीक्षाभूमी, नागपूर येथील विकास कामांचे ई-भूमीपूजन मंगळवार दि. २४ ऑक्टोबर, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता झालेले भूमिपूजन. हया भूमिपूजन सोहळ्याची पोस्ट नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती तथा आयुक्त मनोज कुमार सुर्यवंशी यांनी त्यांचे फेसबुकवर शेयर केली होती. त्यानुसार उद्घाटन एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली आणि नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, परिवहन, महामार्ग विभाग, भारत सरकार, यांच्या प्रमुख उपस्थितीत व देवेन्द्र फडणवीस, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते संपन्न झाले, असा उल्लेख आहे.मात्र त्यावेळी ट्रस्ट मधली मंडळी देखील उपस्थित होती.
जगात कुठल्याही तीर्थक्षेत्राचे पार्किंग ची जागा ही त्या तिथक्षेत्राचे जागेत नाही.कारण जिथे मोठ्या प्रमाणत जनता येत असेल तिकडे ही पार्किंग व्यवस्था केलीच जावू शकत नाही.त्यामूळे राज्यात आणि देशात भक्त निवास व्यवस्था, भोजन आणि पार्किंग लॉट त्या त्या धार्मिक स्थळा पासून लांब निर्माण केले जातात.
दीक्षाभूमी वर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात जगभरातील जनता येत असते.त्यामुळे पार्किंग व्यवस्था तिकडे होऊ शकत नाही.हे ट्रस्ट ला माहित होते.थेट कमर्शिअल बिल्डिंग किंवा मॉल उभारला जाणे शक्य नसल्याने मागच्या दाराने ही अंडरग्राऊंड पार्किंगचे नावावर ही कमर्शिअल बिल्डिंग उभारली जात होती.
ज्या नागपूर सुधार प्रन्यास कडे ही बांधकाम जबाबदारी दिली आहे त्या नागपूर सुधार प्रन्यास
मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप करीत आंदोलन झाले आहे.अर्थात् ही सर्व मिलीभगत आहे.
हयाच बरोबर आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की २०१५ साली मोदींनी इंदुमिल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक भूमिपूजन केले होते.अडीच वर्षात तयार होणारे स्मारक नऊ वर्ष उलटली तरी पूर्ण झाले नाहीय.
काल आंदोलक आक्रमक होई पर्यंत ना सरकार दखल घेत होते ना ट्रस्ट नुसतीच टोलवा टोलवीची भूमिका होती.त्यांनी आंबेडकरी जनतेला हलक्यात घेतले होते.वेळ मारून नेत कमर्शिअल बिल्डिंग पूर्ण करण्याचे त्यांचे मनसुबे उधळले गेले.तरीही आंबेडकरी समुहाने आता हा अनाठायी खर्चाची भरपाई ही ट्रस्टी आणि नागपुर सुधार प्रन्यास कडून करण्यात यावी अशी मागणी केली पाहिजे.कारण हा फंड समाज कल्याण विभागा कडून आलेला अनुसूचित जातीच्या हक्काचा निधी आहे.

राजेन्द्र पातोडे
अकोला
094221 60101

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!