मनमोहन सिंग अचूक बोलले होते..
Anand Shitole
मनमोहन सिंग अचूक बोलले होते ” नोटबंदी म्हणजे संघटित लूट आहे, देशाला लुटण्याचा कट “
मणिशंकर अय्यर द्रष्टा माणूस.
नोटाबंदी फक्त राजकीय उद्दिष्टांनी केलेली होती.
धक्कातंत्र , कुणालाच माहिती नसणे वगैरे सगळ थोतांड आहे.
रिझर्व्ह बँक काय सांगत आहे ?
नवीन डिझाईनच्या ५०० रुपये मूल्याच्या वेगवेगळ्या छापखान्यात छापलेल्या ८८ हजार ३२ कोटी ५० लाख रुपयांच्या नोटा छापल्या गेल्यात पण रिझर्व्ह बँकेकडे आल्याच नाहीत.
नोटा गायब होण्याचा कालावधी आहे एप्रिल २०१५ ते मार्च २०१६
नोटाबंदी झाली नोव्हेबर २०१६ ला , म्हणजे नवीन डिझाईनच्या नोटा वर्षभर आधीच छापलेल्या असतील तर हा निर्णय एकट्याने घेतलेला असला तर माहिती अनेक जणांना होता हे उघड आहे.
छापखान्यातून नोटा छापून निघाल्या पण रिझर्व्ह बँकेत आल्याच नाहीत अस कोण म्हणतय ?
खुद्द रिझर्व्ह बँक, तेही माहिती अधिकार कायद्यात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना.
छापखाने केंद्रीय अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांच्या समन्वयाने चालतात.
एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ मध्ये केंद्रात कुणाच सरकार होत ?
८८ हजार कोटी रुपये हि रक्कम भारतातल्या काही राज्यांचा अर्थसंकल्पापेक्षा मोठी आहे.
इतके पैसे गायब आहेत ?
हवेत उडून गेले कि पाण्यात विरघळून गेलेत ?
लोकहो ,
माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव छापून आलेली बातमी कुठल्या दैनिकाने दिलेली आहे ती नीट बघून घ्या.
खांद्यावर निर्वात पोकळी असलेले झोंबी यालाही निखालस खोट म्हणतीलच.
हा देश लुटून मोडून दोन उद्योगांच्या दावणीला नेऊन बांधलेला आहे.
आमदार खासदार खरेदी निधी नेमका कुठून आलाय ते समजलं का ?
Anand Shitole
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत