सनातन हा डेंग्यू तापासारखा आहे, त्याचा नायनाट केला पाहिजे..”; अभिनेते प्रकाश राज यांचं वक्तव्य

तामिळनाडूचे मंत्री आणि सीएम स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी यांच्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनीही सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केले आहे. स्टॅलिन यांच्या मुलाच्या विधानाची पुनरावृत्ती करत प्रकाश राज यांनी सनातन धर्माला डेंग्यूची उपमा दिली आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाचा पुनरुच्चार करत प्रकाश राज यांनी सनातन हा डेंग्यू तापासारखा आहे आणि त्याचा नायनाट केला पाहिजे, असे म्हटले आहे. आठ वर्षाच्या मुलाला धर्माशी जोडणे हा सनातन धर्म असल्याचे ते म्हणाले. एका मुस्लिम बस कंडक्टरला एका महिलेने त्याची टोपी काढण्यास सांगितल्याचा मुद्दाही राज यांनी उपस्थित केला. प्रकाश राज कलबुर्गी एका कार्यक्रमात म्हणाले की, या देशात प्रत्येकाने जगले पाहिजे. आजही अस्पृश्यतेची मानसिकता आहे. कर्नाटकात एक मुस्लिम बस कंडक्टर होता. त्याने त्याची धार्मिक टोपी घातली होती. एका महिलेने त्याला ते काढण्यास सांगितले. त्यावरुन वाद निर्माण झाला होता. मात्र हा प्रकार पाहणारे आजूबाजूचे लोक कोण होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रकाश राज पुढे म्हणाले की, उद्या जर एखाद्या कंडक्टरने जपमाळ घातली तर तुम्ही त्याला कंडक्टर म्हणून पहाल की देवाचा भक्त ? मीडिया रिपोर्टसनुसार, प्रकाश राज यांनी सांगितले की, १८ वर्षीय तरुण धार्मिक मिरवणुकीत चाकू आणि तलवारी घेऊन जात होते. हे पाहून खूप वाईट वाटते. त्यांनी रोजगार आणि स्वप्नांचा विचार केला पाहिजे. मला आश्चर्य वाटते की त्यांचे ब्रेनवॉश कसे झाले? अठरा वर्षाच्या मुलाला धर्माशी जोडणे हे सनातनचे काम नाही का ? म्हणून हा डेंग्यू ताप आहे जो संपवणे अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान, प्रकाश राज यांचे वाहन समोर येताच हिंदू संघटनांनी काळे कपडे परिधान करून त्यांचा निषेध सुरू केला. संघटनांनी काळे झेंडेही फडकावले. प्रकाश राज यांना हिंदुविरोधी म्हणत त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या जमावाला नियंत्रणात आणताना पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यातही घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत