डॉ.प्रतिभा जाधव यांच्या ‘२००० नंतरच्या कवितेची आस्वादक समीक्षा’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

नाशिक- सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.प्रतिभा जाधव यांच्या ‘२००० नंतरच्या कवितेची आस्वादक समीक्षा’ ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव येथे संपन्न झाला. नूतन विद्या प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी मा.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य.डॉ.सोमनाथ आरोटे यांचे शुभहस्ते बुधवार दि.१०/९/२०२५ रोजी हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी मंचावर डॉ.प्रतिभा जाधव, डॉ.संजय निकम, प्रा.बापू शेळके, प्रा.प्रतीक दळे हे मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वी डॉ.प्रतिभा जाधव यांची कथा, कविता, कादंबरी व नाटक ह्या साहित्य प्रकारातील विविध साहित्यकृती प्रकाशित झालेल्या असून त्यांनी सहा पुस्तकांचे संपादनदेखील केलेले आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यकृतीना गौरविण्यात आले आहे. उत्तम वक्ता तथा एकपात्री नाट्य कलाकार म्हणूनही महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे. महाविद्यालयीन परिवार व स्नेही आप्तेष्ट यांनी त्यांचे पुस्तक प्रकाशनानिमित अभिनंदन केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत