शील पालनाचे फायदे

१) शील म्हणजे मुक्तीच्या मार्गाचा आधार आहे.
२) शील म्हणजे सर्व प्रकारच्या विकारांना नष्ट करणारे शस्त्र आहे.
३) मनुष्याच्या जीवनातील उत्तम अलंकार आहे.
४) शील म्हणजे वाईट गोष्टी पासून वाचवणारे कवच आहे.
५) शील म्हणजे भवसागर पार करणारा पूल आहे.
६) शील म्हणजे अद्वितीय सुगंध आहे. जो सर्व दिशांना पसरतो.
७) शिलाचे पालन केल्याने सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते.
८) समाजात मानसन्मान मिळतो.
९) यश ,कीर्ती प्राप्त होते.
१०) सद्गुणी, धर्मशील कल्याण मित्र मिळतात.
११) शील हे माणसाचे कल्याण करणारे बीज आहे.
१२) शील म्हणजे दुराचरणाला थांबवणारी सीमारेषा आहे.
१३) शील पालन केल्याने मनाला चित्तशुद्धी आणि समाधान मिळते.
१४) शील हे निर्वाणाच्या मार्गाचा प्रारंभ आहे.
१५) वासनेवर विजय मिळवण्यासाठी शील ही शक्ती आहे.
१६) शीलामुळे प्रज्ञा जागृत होते
१७) शीलामुळे समाधी प्राप्त करता येते.
१८) शीला मुळे निर्वाण प्राप्त करणे शक्य आहे.
१९) शील हा एक मौल्यवान दागिना आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावावे लागते.
२०) शिल हे मानवी सुखी जीवनाचा पाया आहे.
संजय सखाराम पवार
खांडोत्री
तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी
मो.न.9137440340
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत