“राष्ट्रवादाच्या नावाखाली पैसे कमवणे….”, – नाना पाटेकरांची प्रतिक्रिया.

‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘गदर २’ सारखे चित्रपट मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत हे त्रासदायक आहे, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या विवेक अग्रिहोत्री यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. तसेच त्यांच्या धर्मामुळे कदाचित दहशतवाद्यांवर त्यांचं प्रेम असेल म्हणून ते अशी वक्तव्ये करत आहेत, अशी टीकाही त्यांनी शाहांवर केली. आता शाहांच्या त्याच वक्तव्यावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नाना पाटेकर यांना नसीरुद्दीन शाहांच्या वक्तव्याबद्दल त्यांचं मत विचारण्यात आलं. “तुम्ही नसीर यांना विचारलं होतं का की त्यांच्यासाठी राष्ट्रवाद म्हणजे काय? माझ्या मते, राष्ट्रावर प्रेम दाखवणे हा राष्ट्रवाद आहे आणि ती वाईट गोष्ट नाही,” असं ते म्हणाले. “गदर हा चित्रपट ज्या प्रकारचा आहे, त्यात तसा आशय असेल आणि मी द केरला स्टोरी पाहिला नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही,” असंही नाना पाटेकर यांनी नमूद केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत