महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

नेमके कुणाचे उपकार तुझ्या वरती..?

तू बिनधास्त बसव गणपती
अन सुरात म्हण आरती,
पण एकदा मनाला विचार
नेमके कुणाचे उपकार तुझ्या वरती..?
.
देवांना ही फुटला घाम
तुझ्या बापाचं कर्तृत्व बघून
हजारो वर्षे तू काय मिळवलं
या मुर्त्या पुढं मागून..?
.
कशासाठी शिकला बाप
का लढला तुझ्या भविष्यासाठी
बाप ठेवला झाकून
अन देवांच्या आरत्याच तुझ्या ओठी.
.
तू कायमचा बुडव गणपती
अन विसरून जा गौराई
तुझ्या पिढ्या बरबाद झाल्या
या अशा अंधश्रद्धे पायी..
.
आज जरी झाला तू हिरो
मोठा सायब वा, लय पैसे वाला
तरी त्यांच्या नजरेत तुझी वळख
फक्त एक जय भीम वाला
.
कशासाठी झिजला बाप
याचा थोडा विचार कर
मग बिनधास्त आयुष्यभर
कुणाचेही पाय धर..
.
तू पुन्हा गुलाम होऊ नये म्हणून
भिमानी बावीस प्रतिज्ञा दिल्या
पोपटा सारख्या तू फक्त
त्या पाठांतरच केल्या..
.
काहीही पुजायच स्वातंत्र्य तुला
भीम बाबांनीच दिलं
पण देवांनी नाही तर तूला
या भीम बाबांनीच माणूस केलं..!
!!..जय भीम..!!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!