वंचित बहुजन आघाडी भाजप -आरएसएस ला सक्षम पर्याय ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम स्वतंत्र कामगार पक्ष आणि त्यानंतर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन (शे का फे) काढून वंचितांच्या हक्क, अधिकार आणि राजकीय स्वातंत्र्य साठी कामकाज करून स्वाभिमान जागृत केला, चळवळ उभा केली. त्याप्रमाणेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष त्यानंतर भारिप बहुजन महासंघ आणि आता वंचित बहुजन आघाडी द्वारे भारतीय समाजात बौद्ध – बहुजन एकत्रित करून भारतीय राजकारणात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले, अकोल्यात आमदार केले.
पंचायत समित्या, जिल्हा परिषद, महानगरपालिका वर यशस्वी राजकीय झेंडा फडकवीला आहे याला अकोला पॅटर्न म्हटलं जात आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेप्रमाणे प्रकाश आंबेडकर हे राजकारणाचे सामाजिकरण करत आहे. त्यासाठी राजकारणात जे पुढारलेले नाहीत, ज्यांना प्रस्थापितांनी प्रतिनिधित्व दिले नाही अशा समाज घटकतील – वंचितातील व्यक्तींना एकत्रित करीत आहेत. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करीत आहेत,त्याला समाजातील तथाकथित अनेक बुद्धिजीवी,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार, रिपब्लिकन गट नेते इत्यादी लोक विरोध करून प्रस्तापिताबरोबर (ज्यांनी आपणा वंचिताना कधीही प्रतिनिधित्व दिले नाही ) आघाडी करा नाहीतर भाजपा -आर एस एस सत्तेवर येईल. ज्यांचे 1984 साली केवळ 2 खासदार होते, त्यांची विचारसरणी चतुरवर्णाची आहे, त्यांनी कधीही समानतेचा पुरस्कार केला नाही, या विचारसरणी च्या विरोधात (पूर्वी भगवान बुद्ध यांनीही )काम करून डॉ बाबासाहेब असबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून न्याय, स्वातंत्र्य,समता, स्वाभिमान दिला. मात्र त्या संविधानाला मनुवाद्यांनी गोधडी म्हटले, तिरंगा तीन कलर अशुभ इत्यादी म्हणून संभावना केली त्याला अद्याप मान्यता नाही त्यांना धर्मावर -मनुस्मृती वरील संविधान पाहिजे. या विचारसरणी विरोधात प्रस्थापीत काँग्रेस आणि इतर राजकारणी – पक्ष यांनी काय केले?
सन 2019 च्या निवडणुकीत वंचितची हवा झाली.तीच्यामुळे प्रस्थापीत काँग्रेसचे सुमारे 15 उमेदवार हरले, आज रोजी काँगेस, शिवसेना व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष फुटलेले आहेत त्यांची आज किती ताकद? याचा आरसा प्रकाश आंबेडकर यांनी दाखविला, यांना एका मागासवर्गीय – वंचित घटकाने आरसा दाखविलेले आवडले नाही नव्हे ते अजूनही आम्ही प्रमुख प्रस्थापित आहोत असेच वागत आहेत पण खरे पाहता ते त्यांच्या जातीच्या वर्णाप्रमाणे वागत व वागवत आहेत हे आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या वागणुकीवरून स्पस्ट झालेले आहे.
प्रस्थापित काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांना खरेच संविधान वाचावायचे आहे तर मग ज्यांच्यामुळे त्यांचे उमेदवार पडले आहेत त्यांना पहिले का विचारात- आघाडीत घेतले नाही? जे प्रकाश आंबेडकर यांना व त्यांच्या स्वभावाबद्दल बोलतात त्यांच्या पाठीमागे किती लोक आहेत, त्यांचे संघटन कुठे आहे? गल्ली बोळातले पण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात? त्यातील काही तर आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या विरोधातील भाजपा – आर एस एस कडे जाऊन त्यांचा प्रचार ही करत आहेत याचे काय? मग बाबासाहेब यांच्या चळवळीचे काय? त्यांच्या विचाराचे काय?किती वैयक्तिक स्वार्थ करायचा?
आता चळवळीचा एकच नेता आणि तोपण खमक्या म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आहेत हे सिद्ध झाले आहे.
आता सक्षम न राहिलेले काँग्रेस- शिवसेना -राष्ट्रवादी (माविआ ) भाजपा -आरएसएस सत्तेत येऊ नये म्हणून वंचित बरोबर का समझोता केला नाही याचे काय? जसे काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी स्वतः कमी जागा घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे यांना सर्वात जास्त जागा कशा दिल्या तशा वंचितला सन्मानाने का नाही दिल्या? (टाळी एका हाताने वाजत नाही.) आताच्या निवडणुकीत सर्व स्पष्ट होईलच…..की कोण कुणाला पर्याय आहे.
प्रस्थापित काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी हे विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना प्रथमच विचारात घेऊन शहाणपण दाखवतील!!!
धम्मयान मीडिया टीम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत