भारतीय लोकशाही आणि संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे. – आदरणीय एस के भंडारे सर



तुळजापूर : 27/4/2024,दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेच्या वतीने महामानवांची जयंती आणि संविधान संरक्षण अभियान अंतर्गत पदाधिकारी कार्यकर्ता संवाद मेळावा दिनांक 27/4/2024 रोजी,सकाळी ठीक 11.30 वाजता, आनंद बुद्ध विहार हडको तुळजापूर येथे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष,मुंबई कार्यालय प्रमुख,तथा स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल भंडारे एस के साहेब आणि महाराष्ट्र राज्य संघटक आयु. शारदा ताई गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजीत करण्यात आला.
यावेळी यावेळी भारतीय बौद्ध महासभा दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा विजयमालाताई धावारे जिल्हा सरचिटणीस विद्यानंद वाघमारे,जिल्हा कोषाध्यक्ष राजश्रीताई कदम तर भारतीय बौद्ध महासभा उस्मानाबाद उत्तरचे जिल्हाध्यक्ष हनुमंत प्रतापे,जिल्हा सरचिटणीस ऍड.दिलीप निकाळजे,जि कोषाध्यक्ष ऍड.किशोर पायाळ यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच समता सैनिक दलाच्या वतीने पंचशील ध्वजाला मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना एस.के भंडारे म्हणाले की,परिवर्तनवादी महापुरुषांच्या जयंती आणि स्मृतिदिन साजरे करत असताना जातीयंताचा लढा उभारणं अत्यंत गरजेचा आहे.जाती-जातीमध्ये विखुरलेल्या माणसांना परिवर्तन वादाच्या वाटेवर आणून एकत्रित केलं पाहिजे.या प्रमुख उद्देशासह अनेक विषयांवर प्रकाश टाकण्याचे काम केले.
तर यावेळी उस्मानाबाद दक्षिण आणि उत्तर च्या सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.या पदाधिकारी कार्यकर्ता संवाद मेळाव्यास जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष विश्वास भाऊ पांडागळे,जिल्हा महिला उपाध्यक्ष शीलाताई चंदनशिवे,जिल्हा संस्कार उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे,जिल्हा हिशोब तपासणीस देविदास कदम,समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सरतापे,जिल्हा संघटिका मीनाताई लागडे,यांची प्रमुख उपस्थिती होती.तर तर यावेळी उस्मानाबाद जिल्हा दक्षिणच्या उमरगा उस्मानाबाद तुळजापूर लोहारा तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे सर्व तालुकाध्यक्ष तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, ग्राम शाखा व समता सैनिक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पदाधिकारी कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटक विजय अशोक बनसोडे यांनी केले तर सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस विद्यानंद वाघमारे यांनी केले आणि उपस्थित यांचे आभार जिल्ह्याच्या कोषाध्यक्ष राजश्रीताई कदम यांनी मानले. या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी बापू जावळे,महादेव एडके,बाबा कांबळे,सचिन दिलपाक,स्वराज जानराव,आशाताई,मनीषा गायकवाड,बालिकाताई जावळे,सीताताई सोनवणे, आम्रपाली भंडारे,किशोर भंडारे,उमरगा तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे,उमरगा लोहारा तालुकाध्यक्ष तानाजी माटे, तुळजापूर तालुकाध्यक्ष रामेश्वर चंदनशिवे,उस्मानाबाद तालुका सरचिटणीस उमाजी गायकवाड,प्रशांत भंडारे,विठ्ठल सुरते,वैभव सिरसाट यांच्यासह समता सैनिक दलाच्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत