लोकसभा 2024 निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या..
लोकसभा 2024 च्या रणसंग्रामात देशाचे सत्ताकारण आपल्या हातात घेण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जिथे 19 एप्रिल ला मतदान आहे अशा ठिकाणी काल प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सगळीकडे सभा आणि दौरे चालू होते.
महाराष्ट्रातील 5 तर देशातील 102 मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहेत. महाराष्ट्रात ज्या पाच मतदारसंघात पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार आहे, त्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा, गडचिरोली या मतदारसंघांचा समावेश आहे. त्याठिकाणचा प्रचार बुधवारी संपला.
महाराष्ट्रातल्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला. नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या. आता विदर्भातील मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात कौल टाकतात, यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.
प्रचार करणार नाही, पोस्टर लावणार नाही मत मागणार नाही असं म्हणणारे नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी बॅनर, फिरते प्रचार रथ नेमले होते.
बुधवारी मात्र हा प्रचार शांत झाला आणि आता मतदार राजा कोणाच्या पारड्यात सत्तेची सूत्रे देतो हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत