अजित पवार पुन्हा घसरले; जनतेचा निधी जनतेलाच पाहिजे असेल तर “कचा कचा बटण दाबा – पाहिजे तेवढा निधी देतो “असे प्रलोभानात्मक आवाहन ?
पुणे : लोकसभा 2024 च्या प्रचाराची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे तसेच प्रचाराचा स्तर ही बदलत चालला आहे. आपल्या मुक्तवाणी ने वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिध्द असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बोलताना पुन्हा तोल सोडला.
बुधवारी इंदापूर दौऱ्यावर असताना लोकशाहीची थट्टा करणारे विधान केले. जणू काय स्वतःच्या घरून किंवा खिशातून निधी देणार असल्याचा आव आणत “आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देतो, पण तुम्ही मशीनची कचाकचा बटनं दाबा ” असे एक प्रकारे मतदारांना प्रलोभन देणारे विधान अजित पवार यांनी केले.
त्यांच्या याच विधानावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून जनतेच्या टॅक्सच्या पैशाची प्रलोभने दाखवणे आचारसंहितेचा भंग नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जणू काय स्वतःच्या खिशातून निधी देत असल्याच्या आविर्भावात बोलल्याने जनतेत हा संदेश जातो की यांना मत दिल तरच विकास निधी मिळेल अन्यथा नाही. ही एकप्रकारे “निधी बद्दलची अडवणूक करू” अशी धमकी आहे का काय असा प्रश्न सर्वसामान्य मतदाराला पडला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत