माढा अमरावती पाठोपाठ आता पुण्यातही भाजपा मध्ये अंतर्गत नाराजी; संजय काकडे यांच्या फेसबुक पोस्ट वरून अंतर्गत बंडाळी उघड

पुणे : भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते ज्यांनी पक्ष उभा करण्यासाठी परिश्रम घेतले ते आज उमेदवारी मिळावी म्हणून कसरत करताना दिसत आहेत. पुणे इथला उमेदवार घोषित झाल्यानंतर संजय काकडे यांनी फेसबुक पोस्ट करत मागील १० वर्षात आपण पक्षासाठी कायकाय केले याचा अहवालच सादर केला आहे तसेच आपण उमेदवारीसाठी इच्छुक आहोत अगदी AB फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण इच्छुक राहणार असल्याचं सांगितलं आहे.
यामुळे भाजप उमेदवाराच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळून आलीय. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं माजी महापौर मुरलीधर मोहोळांना (Murlidhar Mohol) तिकीट दिलं. भाजपचे मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) असा थेट सामना पुण्यात रंगणाराय. मात्र त्याआधी मोहोळांना पक्षातूनच विरोध होतोय.
तिकडे अमरावती मध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. बऱ्याच जणांनी असहकार्याची भाषा बोलून दाखवली आहे. बच्चू कडू यांनी तर युती मधून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे तर अडसूळ यांनी प्रचार करणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे.
भाजपा मध्ये आयात केलेले संधीसाधू उमेदवार प्रचलित जुन्या कार्यकर्त्यांच्या असंतोषाचे कारण बनत चालले आहेत व याचा येणाऱ्या निवडणुकीत भाजपा ला जबर फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत