दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन.
दैनिक जागृत भारत च्या वतीने आदरांजली.
रायगड : जिल्हयातील अलिबाग येथील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या. १९९९ मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. शेकापचे आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत