राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पावसाची शक्यता; नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन.
राज्यातील हवामानात बदल होत आहे. अलीकडेच राज्यात ४२ डिग्री इतके तापमान नोंदविण्यात आले असून उन्हाची धग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो. याच कारणास्तव राज्यातील वाढता उकाडा पाहता आरोग्य विभागानं नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत उष्माघातापासून वाचण्यासाठी काही उपाययोनाही सुचवल्या आहेत.
फक्त दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या वेळीसुद्धा राज्यात तापमानाचा आकडा वाढला असून, नांदेड, अकोला, बुलढाण्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला राज्यातील सरासरी तापमान 40 अंशांहून जास्तच असल्यामुळं साधारण 4.5 अंशांनी वाढ झाल्याचं लक्षात येत आहे.
एकिकडे राज्यात उकाडा वाढत असतानाच दुसरीकडे पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 48 तासांमध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशीव, लातूर, सांगली, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूरसह साताऱ्यातही तुरळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणच्या किनारपट्टी भागामध्ये उष्णता अधिक तीव्र जाणवेल, तर अंतर्गत भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून उकाडा जाणवू शकतो.
अशा वातावरणात वयोवृद्ध लोक व लहान बाळाची विशेष काळजी घेण्याचे तसें अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन दैनिक जागृत भारत च्या वतीने करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत