नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यात ४.२ तीव्रतेचा भूकंप; सौम्य धक्के असल्याने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन.
नांदेड : जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ६ वाजून ९ मिनिटांदरम्यान भूकंपाचे दोन धक्के जाणवले. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होउन घरा बाहेर पडले होते. नांदेड शहरासह अर्धापूर, भोकर, हदगाव, नायगाव, मुखेडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी धक्के जाणवले. काही गावात भिंतीना तडे गेले. मार्चच्या पहिल्या आठवड्यातही येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते.
भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिह्यातील आखाडा बाळापूरपासून १५ किलोमीटर असून या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या धक्क्यामुळे जिल्ह्यात कुठेही नुकसान झालेलं नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत