IPL; धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर
चेन्नई : महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या आता सर्व चिंता दूर झाल्या आहेत.
आयपीएलपूर्वी धोनीच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. गेल्या वर्षी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे धोनी आता या वर्षी काय करणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण एक महत्वाची गोष्ट धोनीला गेल्या आयपीएलमध्ये करता आली नव्हती, ती म्हणजे हेलिकॉप्टर शॅाट. पाठीच्या दुखण्याने मागील सिजन मध्ये हा शॉट पाहायला मिळाला नव्हता पण आता धोनीने यासाठीचा सराव सुरू केलेला आहे. त्यामुळेच धोनीच्या चाहत्यांची चिंता आता मिटलेली आहे.
धोनीच्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर मागच्या वेळी चेन्नईने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे आता यावर्षी धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा चेन्नईचा संघ विजेतेपद पटकावणार का, याची उत्सुकता आता सर्वांना असेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत