महाडचा सत्याग्रह म्हणजे धर्मा बरोबर केलेले हे खरेखुरे धर्मयुद्ध.. – संतोष पाटणकर
आठवतो का आजचा 97वर्षापुर्वीचा दिवस?
धर्माच्या ठेकेदारांनी निसर्गाने दिलेले पाणी प्यायला आम्हाला मनाई केली होती. कुत्रे, मांजर,गुरे ,ढोरे यांना जेवढा मान होता तेवढा आमच्या जातीला नव्हता.
धर्माच्या ठेकेदारांना अगदी घाणीत बरबटलेल्या कुत्र्याचाही स्पर्श चालायचा पण आमच्या जातीच्या स्वच्छ माणसांच्या स्पर्शाला ते विटाळ मानत असत. माणूस असून आमच्या जातीच्या लोकांच्या वाट्याला किड्यामुंग्यापेक्षा हिन जीवन धर्माच्या ठेकेदारांनी दिले होते. हे सर्व देवाच्या नावावर आमच्यावर थोपवले जात होते. हे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हेरले.
म्हणूनच त्यांनी 20मार्च1927 रोजी आमचा उद्धार करण्यासाठी चवदार तळे सत्याग्रह केला. आम्हीही माणसासारखी माणसे आहोत. उचनीचता संपवून टाकण्यासाठी अर्थात समता निर्माण करण्यासाठी हा सत्याग्रह होता. हा सत्याग्रह म्हणजे धर्मा बरोबर केलेले हे खरेखुरे धर्मयुद्ध होते. महभारतातले युद्ध राजपाटासाठी होते. ते खरे धर्मयुद्ध नव्हते. खरे धर्मयुद्ध विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे हे कायम लक्षात असू द्या.
आयु. संतोष मधुकर पाटणकर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत