दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

मनुस्मृतीच्या काळात स्त्री ची अवनती, व बाबासाहेबांच्या काळात स्त्रीची उन्नती…

बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा शुद्रासंबंधीचा अभ्यास चालविला होता, त्यावेळी, त्यांना भारतातील स्त्रियांच्या प्रश्नाचाही अभ्यास केला . शूद्रांचा प्रश्न व स्त्रियांचा प्रश्न हे दोन्ही मूळ जवळ जवळ एकच होते . त्या काळच्या ब्राम्हण्यवादी धर्माच्या लाटेतच स्त्रियांनाही अधाःपतीती करण्यात आले . म्हणजे एका प्रकारे स्त्रियांनाही शुद्र बनविण्यात आले. डॉ. बाबासाहेबांनी याबद्दल संशोधन खालील प्रकारे केलेलं आहे.

????मनुस्मृतीतील स्त्री- निंदा
” २. २१६ : पुरुषांना वश करणे हा स्त्रियांचा स्वभाव आहे . म्हणून शहाण्यांनी स्त्रियांच्या संगतीती गाफील राहता कामा नये. “
????” २. २१४ : स्त्रियांवर कुमार्गाचा शिक्का मारण्यासाठी मनू लिहितो :-
केवळ मुखार्लाच नव्हे तर शहाण्या पुरुषालासुद्धा कुमार्गाला नेऊ शकतात ; वत्यास वासनेचा व क्रोधाचा गुलाम बनवू शकतात . “
आई, बहिण, मुलगीसुद्धा, कशी वागू शकते हि निंदा करतांना मनु पुढे लिहितो –
“???? २.२१५ : पुरुषांनी स्त्रियांबरोबर एकांत जागी बसू नये मग स्वतःची आई, बहिण वा मुलगी असो . कारण वैषयिक इंद्रिये फार जहरी असतात. अशी इंद्रिये शहाण्या पुरुषालाही हुकुमतीत ठेवतात.”
स्त्रिया संस्कृतीहीन व रानटी असतात.
:???? ९. १४ : स्त्रिया सौदर्याची फिकीर करीत नाहीत, ना त्यांचे लक्ष पुरुषाच्या वयाकडे असते.तो पुरुष आहे एवढेच त्यांना पुरेसे असते. मग तो सुंदर असो वा विद्रूप .”
स्त्रिया नवऱ्याचा विश्वासघात करणाऱ्या असल्याचा आरोप लादण्यासाठी मनु पुढे लिहितो –
” स्त्रियांवर कितीही देखरेख ठेवली तरी त्यांना पुरुषाची असलेली ओढ , अबोल स्वभाव व हृद्यशून्यता यामुळे आपल्या नवऱ्याशी एकनिष्ठ ण राहता व्यभिचारी बनतात. “
स्त्रिया जणू सर्व दुर्गुणांनि कशा बरबटलेल्या असतात असा भयंकर शिक्का मारतांनामनूने असेनमूद केले आहे, स्त्री- निर्मितीच्या वेळीच स्त्रियांच्या वाट्याला पलंग, दागिने दिले असून , स्त्रियांच्या अंगी अशुद्ध वासना असतात. क्रोध, असतो , लबाड असते, दुष्टत्व असते आणि दुर्वर्तन असते . “
स्त्रियांना कधीच स्वातंत्र्य देता कामा नये; त्यांना सदैव गुलामगिरीत ठेवले पाहिजे असाही भयंकर पुरस्कार मनुस्मृतीत करण्यात आलेला आहे. स्त्रियांना रात्र आणि दिवस पुरुषाच्या हुकमतीत खाली ठेवले पाहिजे . “

????धर्शास्त्राचे उगारलेले शस्त्र ………
स्त्रियांना हीन लेखण्याचा व त्या सर्व दृष्टीने नालायक असल्याचा हल्ला प्रथमता मनूने त्याच्या मनुस्मृतीत केला आहे . विधवेने जीवन जगले काय अगर मेले काय , दोन्ही सारखेच आहे ; तिला जिवंत राहावयाचे असले तर किती तुच्छतामय स्थितीतील नरक यातना सहन केल्या पाहिजेत असा भयंकर प्रहर मनुनेच प्रथमकेला .नवरा मरण पावल्या नंतर विधवेने दुसऱ्या पुरुषाचे नाव सुद्धा उच्चारता कामा नये, असा दंडक विधवेवर लादण्यासाठी मनु धर्म- शास्त्रात लिहितो .

????स्त्रियांचे अर्धे अधिक – व्यक्तिमत्व नष्ट ……

अशा प्रकारे , स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा अर्ध्याहून अधिक नाश मनूने करून टाकला होता.
बिचाऱ्या हिंदू स्त्रियांना त्या धर्मशात्राविरुद्ध काहीच इलाज नव्हता.

परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सती ,बालविवाह , विधवाविवाह बंदी व सन्यास यांची मुळ कारणे दिलेली आहेत .त्यांच्या मते ‘ जाती ‘ संस्था टिकवणे हे त्याचे मुळ कारण व खरे कारण आहे . सती असेपर्यंत जाती नष्ट होणार नाहीत . सती राहिल्यास वर्णाश्रम राहील , मनुस्मृती जारी राहील सती नष्ट झाल्यास जाती मोडण्यास मदत होईल, वर्णाश्रम मोडण्यास मदत होईल , मनुस्मृतीचे उच्चाटन करण्यास मदत होईल, बालविवाह राहिल्यास , जाती राहतील, वर्णाश्रम राहील, मनुस्मृती राहील . बालविवाह मोडल्यास , जाती वर्णाश्रम व मनुस्मृती दूर करण्यास मदत होईल मनुस्मृतीचे उच्चाटन करण्यास मदत होईल.
या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचे संशोधन डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी केले आहे. हे संशोधन अर्थातच अत्यंत क्रांतिकारक आहे .
म्हणूनच अशा ह्या जातीभेद्क मनुस्मृतीचे दहन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २४-१२-१९२७ रोजी महाडच्या भूमीत केले . व खऱ्या अर्थाने स्त्री हि स्वातंत्र्य झाली .

????त्यानंतर १९४४ ला “हिंदू कोड बिल ” हा कायदा हिंदू समाजाला लागू पडणारा कायदा ब्रिटीश अमदानीत तयार करण्यात आला . डॉ..बाबासाहेब आंबेडकर यांनी ” हिंदू कोड बिल ” कायद्याला कायदेशीर भाषेची लेणी लेवविण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले ते काम बाबासाहेब अत्यंत काळजीपूर्वक व सचोटीने करत होते . त्यावेळी त्यांची प्रकृती पण बरी नव्हती तरी देखील ते हिंदू कोड बिल् साठी खूप मेहनत घेत असत. आणि अशा प्रकारे अनेक प्रसंगांना तोंड देऊन त्यांनी हे हिंदू कोड बिल तयार केले.

परंतु त्या बिलात जे ठराव बाबसाहेबांनी मांडले होते ते पूर्णतः स्त्रियांच्या हितसंरक्षणाचे होते . परंतु जीर्णमतवाद्यांना हा कायदा मंजूर नव्हता ,कारण त्यांचा मुख्य मुद्दा हा होता कि डॉ. बाबासाहेब हे अस्पृश्य होते आणि त्यांच्या हातून हे स्मृतीशास्त्र फेरफार म्हणजे केवढा भ्रष्टाचार आणि नरकाचा मार्ग अशी त्यांची विचारसरणी होती. आणि म्हणूनच त्यांनी ह्या ” हिंदू कोड बिल ” कायद्यास तीव्र विरोध केला . आणि डॉ. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल ज्या स्वरुपात तयार केले होते त्याच स्वरुपात ते मंजूर झाले पाहिजे या भूमिकेला ते चिकटून बसले होते. कारण या कायद्यामुळे बहुजनसमाजचे जेवढे हित होईल तेवढे हित घटना करू शकत नाही असे त्यांचे मत होते. आणि शेवटी बाबासाहेब खूप संतापले व त्यांनी निराश होऊन आपण एवढी मेहनत घेतलेल्या बिलाचा असा शेवट पाहून ते मनस्वी खिन्न झाले व त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
तरी बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून भारतातील तमाम स्त्रीवर्गास त्यांचे हक्क व अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत .

अशा या महामानवास जागतिक महिला दिनी त्रिवार अभिवादन व कोटी कोटी प्रणाम …..

भारतातील सर्व स्त्रियांना ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!