रमाई अकॅडमी सोलापूर या निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या विद्यार्थ्यांचे रेल्वे परीक्षेत घवघवीत यश..

सोलापूर प्रतिनिधी : बहुजन विचारमंच सोलापूर संचलित रमाई अकॅडमी या निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात प्रशिक्षित विद्यार्थ्यांपैकी खाली नमूद करण्यात आलेल्या तीन उमेदवारांनी व प्राचार्य सोनकांबळे सरांच्या खाजगी कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थिनीने फेब्रुवारी 2024 मध्ये रेल्वेच्या ग्रुप सी Group C पदावर उज्ज्वल यश संपादन केले आहे.
- भावेश जाधव
- अखिलेश पाटील
- नीता मंडला
- पूनम घोरपडे (प्राचार्य सोनकांबळे सर यांच्या खाजगी कोचिंगची विद्यार्थिनी)
14 एप्रिल 2022 पासून डॉ. एम डी शिंदे सर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे रमाई अकॅडमी या नावे निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात एकूण 9 जणांना यश प्राप्त झाले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार मार्गदर्शन मिळावे यासाठी रमाई अकॅडमी ची संपूर्ण टीम मागील दोन वर्षांपासून परिश्रम घेत आहे. या पूर्वी नोव्हेंबर 2023 मध्ये 6 विद्यार्थी निवडले गेले आहेत.
प्राचार्य सोनकांबळे ए ए सर यांच्या अथक परिश्रमामुळे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टाने हे ध्येय साध्य केले आहे.
प्राचार्य सोनकांबळे सर आणि यशस्वी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन डॉ. एम डी शिंदे (अध्यक्ष रमाई अकॅडमी निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग) यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे आणि सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांना या निःशुल्क मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत