आरोग्यविषयकमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्ग येथे ट्रॉमा केअर सेंटरला मंजूरी.. अपघातग्रस्ताना आता तातडीने मिळणार उपचार

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात आहे. महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढते आहे. भीषण अपघातातील रुग्णांवर वेळीच उपचार व्हावे, यासाठी नळदुर्ग येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी आपण सातत्याने मागणी करत होतो आज त्याला यश मिळाले असून पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालयात विशेष बाब म्हणून ट्रॉमा सेंटर ला मंजुरी दिली असल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.


अपघातानंतरचा ‘एक तास’ मोलाचा असतो. याच काळात अपघातस्थळापासून नजीकच्या उत्तम हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्ताचे प्राण वाचतात. त्यासाठी नातेवाईकांना भरमसाठ खर्चाचा भार सोसावा लागतो. राज्यातील महत्वाच्या महामार्गां पैकी एक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वर अशा तातडीच्या वैद्यकीय सुविधांची कमतरता होती. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या अनेकांना वेळेत उपचार न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागत होते. त्यामुळे नळदुर्ग येथे ट्रॉमा सेंटर उभारण्यासाठी आपला विधिमंडळात व सरकार पातळीवर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामाध्यमातून पाठपुरावा सुरू होता.
अपघात घडल्यानंतर जखमींना जवळच्या खाजगी किंवा सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले जात आहे. त्यामुळे शासकीय ट्रॉमा केअर सेंटर असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना एकाच सेंटरवर सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार मिळणे शक्य होणार आहे.
ट्रामा केअर सेंटर म्हणजे प्रथम दर्जाच्या विनोद मध्ये न्यूरोसर्ज , इंटेन्सिव्हिस्ट ,जनरल सर्जन , ऑर्थोपेडिकी सर्जन, ऍनेस्थेसिस्ट , निवासी वैद्यकिय अधिकारी आणि कुशल परिचारिका या उपस्थित असतात तसेच ऑपरेशन थिएटर आणि आता अति दक्षता विभागात सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपकरणे सोयी सुविधा उपलब्ध असतात. आपत्कालीन यंत्रणासाठी लागणारी सर्व सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध होते त्यामुळे एका अपघातग्रस्ताचा जीव वाचला जातो यासाठी ट्रॉमा केअर सेंटरची गरज असल्याने तुळजापूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाने आणि गावकऱ्यांच्या मागणीने या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी तात्काळ मंजूर करून नळदुर्ग आणि परिसरातील या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आसल्याने आपघात ग्रस्ताना तात्काळ मदत मिळू शकेल आशा पद्धतीने नागरकाना खुप मोठा दिलासा मिळालेला आहे त्यामुळे सर्व स्तरातून या सर्वांचा अभिनंदन व कौतुक होत आहे .


नळदुर्गकरांची चिकाटी, लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे प्रयत्न ,
आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांची मंजुरी यामुळे आपघात ग्रस्ताना दिलासा मिळत नळदुर्गकरांन मध्ये समाधान व्यक्त होत आहे .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!