अंबरनाथ येथे एक दिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलन संपन्न..

काल दिनांक 24 फेब्रुवारी 2024 अंबरनाथ येथे एकदिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलन, रोटरी कम्युनिटी हॉल येथे पार पडले. ज्येष्ठ विचारवंत प्रा. रणजित मेश्राम सर हे संमेलनाचे अध्यक्ष होते तर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी अनिल भालेराव यांच्या “मातेरं” या कथासंग्रहाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. साहित्य संमेलनाचे स्वागतध्यक्ष बी. अनिल तथा अनिल भालेराव यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून लेखक डॉ. डी. एस. सावंत, डॉ. रविंद्र जाधव, लेणी संवर्धनाचे पुरस्कर्ते शामराव सोमकुवर, उदयोजक सुनील दुपटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या संमेलनास आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक मंडळी, साहित्य क्षेत्रातील मान्यवर, लेखक विचारवंत यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत