शनिवार दि.24 फेब्रुवारी 2024 रोजी आंबेडकरी साहित्य संमेलन

अंबरनाथ : ज्येष्ठ साहित्यिक बी. अनिल तथा अनिल भालेराव यांच्या सेवा संस्था आयोजित आंबेडकरी साहित्य संमेलन अंबरनाथ येथे शनिवार दि.24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होत आहे . याचे ठिकाण, रोटरी कम्युनिटी हॉल , वडवली सेक्शन , अंबरनाथ पूर्व , जि .ठाणे असा आहे .
या साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ.बालाजी किणीकर आहेत. तर संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे असून स्वागताध्यक्ष स्वतः बी . अनिल आहेत.
या साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून संविधान सैनिक संघाचे प्रमुख, डॉ. रवींद्र जाधव उपस्थित राहणार आहेत.
नुकताच डॉ. रवींद्र जाधव यांना कोकण साहित्य संमेलनात अपरांत भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच ते “स्वागताध्यक्ष “म्हणून देखील होते .
अंबरनाथ येथे आयोजित केलेल्या या साहित्य संमेलनामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ” आपले संविधान ” या पुस्तकाचे लेखक नूरखाँ पठाण आहेत. तसेच मा. सुरेश साबळे ( बुलढाणा ) हे देखील आहेत. संविधानाने भारतीय जनतेला काय दिले ? या विषयावर हे प्रमुख वक्ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी बी. अनिल यांचे मातेंर या कथासंग्रहाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणार आहे. त्यानंतर परिसंवाद होतील . विषय मराठी साहित्यातील आंबेडकरवादी साहित्यिकांचे योगदान आणि भूमिका या विषयावर प्रा. डॉ. राजाभाऊ भैलुमे (पुणे ) मा. किरण सोनवणे ( पत्रकार), संजय सोनवणे (बदलापूर) हे वक्ते बोलणार आहेत.
प्रा. डॉ. आनंद दांडगे परिसंवादात सहभाग घेतील. त्यानंतर अनेक कवींना काव्य वाचनासाठी निमंत्रित केले असून कवी संमेलन देखील होणार आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र जाधव हे सन २०२२ मध्ये घडलेल्या ७ व्या राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलन, कल्याणचे उद्घाटक म्हणून लाभले होते. त्यानंतर सन 2023 मध्ये बदलापूर येथे घडून आलेल्या राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . सन 2024 मध्ये कणकवली येथे जेष्ठ साहित्यिक ज. वि.पवार, उर्मिला पवार , यांच्या संस्थेने आयोजित केलेल्या ‘अपरांत सम्यक साहित्य कला संगिती’ संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष म्हणून सन्मानित झालेले आहेत. तर आता 24 फेब्रुवारी 2024 रोजी अंबरनाथ येथे घडणाऱ्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे ते प्रमुख पाहुणे असणार आहेत.
या साहित्य संमेलना विषयी बोलताना डॉ. रवींद्र जाधव म्हणाले, आम्ही 2017 मध्ये सुरू केलेली संविधानवादी चळवळ महाराष्ट्रात जोमाने पसरत आहे. फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीची पुढील दिशा किंवा टप्पा हा संविधानवादी तरुणांची फळी उभी करून संविधानाचे रक्षण करणे असा आहे. संविधान प्रचार – प्रसार, प्रबोधन करून हक्क – अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक आंदोलने उभी करणे, शासन- प्रशासनावर दबाव गट निर्माण करणे, घराघरात संविधानाचे सैनिक निर्माण करणे आदी महत्त्वपूर्ण कार्य आमचे कार्यकर्ते करीत आहेत. म्हणून साऱ्या संविधानाच्या सैनिकांनी मोठ्या संख्येने या साहित्य संमेलना मध्ये उपस्थित रहावे आणि संविधानवादी चळवळीचा वेग वाढवावा “.अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत