अरे हुकूमशहा सरकार, तुमच्या छाप्यांमुळे मी घाबरणार नाही.-सत्यपाल मलिक

“अरे हुकूमशहा सरकार, तुमच्या छाप्यांमुळे मी घाबरणार नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकरी रास्त मागण्यासाठी आंदोलन करत असून मी त्यांच्यासोबत आहे…”,
असे निवेदन जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रुग्णालयातून प्रसिद्ध केले आहे. मलिक सध्या आजारी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले आहे. या स्थितीचा फायदा घेत केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांनी त्यांच्या घरावर आज छापेमारी केली. त्यांच्या कर्मचारी वर्ग तसेच घरातील नोकरदार ड्रायव्हर यांच्यावरही छापे टाकून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. ही माहिती समजल्यावर मलिक यांनी हे निवेदन प्रसिद्ध करून “केवळ त्रास देण्याच्या हेतूने हुकूमशाह सरकार हे सर्व करत आहे”, असे म्हटले आहे.
मलिक यांनी पुलवामा प्रकरणातील सत्य देशासमोर मांडले होते. सीआरपीएफ जवानांना पुरेसे संरक्षण तसेच त्यांच्या प्रवासासाठी विमानाची सोय केली नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. या प्रकरणात एक दुष्ट हेतू होता, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते. मलिक यांनी ही बाजू मांडल्यावर त्यांना गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकारे त्रास देण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत