मनोज जरांगे सह २०० जणांवर गुन्हा दाखल..

बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मोडल्याने व जेसीबी चा धोकादायक पद्धतीने वापर केल्याने मनोज जरांगेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह 150 ते 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरासह उमरद फाटा येथे सभा घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यासह 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी मनाई आदेश जारी केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी रॅली काढण्यास आणि सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. तरीही मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यात सभा घेतली आणि रॅली काढली होती. त्यामुळे मनोज जरांगेंवर कारवाई करण्यात आली.
मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या यामध्ये बीड शहरातील नाळवंडी नाका भागात तसेच बीड तालुक्यातील उंमरद फाटा येथे सभा पार पडली. यादरम्यान विनापरवानगी सभा आयोजन, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच जेसीबीचा असुरक्षित रित्या वापर या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांच्यासह दीडशे ते दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पेठ बीड पोलीस ठाण्यात जरांगे पाटील यांच्यासह इतर 150 तर पिंपळनेर पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान यापूर्वी देखील बीडच्य अमळनेर आणि शिरूर पोलीस ठाण्यात मनोज जारंगे पाटील यांच्यावर रास्ता रोको प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत