पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून आणखी निर्बंध…

पैसे हस्तांतरण, UPI या सुविधाही ग्राहकांना २९ फेब्रुवारीनंतर मिळणार नाही. पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व बँकेनं आज आणखी काही निर्बंध लादले. त्यानुसार २९ फेब्रुवारीनंतर ग्राहकांच्या खात्यात किंवा त्याच्याशी संलग्न फास्ट टॅगमध्ये, वॉलेट्स, NCMC कार्डमध्ये कुठलीही रक्कम जमा करता येणार नाही किंवा त्या आधारे कर्ज देता येणार नाही. या खात्यात केवळ व्याज, कॅशबॅक किंवा रद्द झालेल्या व्यवहारांचे पैसे जमा करता येतील. या खात्यात रक्कम शिल्लक असेपर्यंत ग्राहक कुठल्याही निर्बंधांशिवाय पैसे काढून घेऊ शकतील. ११ मार्च २०२२ पासून बँकेला नवे ग्राहक घेण्यावर निर्बंध आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत