१६ व्या वित्त आयोगाच्या ४ सदस्यांची नियुक्ती…

नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पानगढीया यांच्या अध्यक्षतेखाली ३१ डिसेंबर रोजी सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. सोळाव्या वित्त आयोगाला १ एप्रिल २०२६ पासून ५ वर्षांच्या कालावधीसाठी शिफारशी देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर केंद्र सरकारनं १६ व्या वित्त आयोगाच्या चार सदस्यांची आज नियुक्ती केली. यामध्ये माजी केंद्रीय सचिव अजय नारायण झा, अॅनी जाॅर्ज मॅथ्यू, अर्थ ग्लोबलचे कार्यकारी संचालक डाॅ निरंजन राजाध्यक्ष यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्यकांती घोष यांची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत