प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

उद्या सातारमध्ये वंचित बहुजन आघाडीची सभा.

प्रतिनिधी सातारा:
आजवर अनेक निवणुकांमध्ये प्रामाणिक सातारकरांचे मतदान बिनबोभाट घेऊन आणि आमचा बालेकिल्ला, आमची राजधानी या गोडव्यात अडकवून जुन्या म्हणितील भोळ्या सातारच्या लोकांना आजतागायत वेड्यात काढले गेले आहे. आणि सातारकरांच्या अनेक पिढ्यांचे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अंधकारात ढकलून संपूर्ण जिल्ह्याची घडी विस्कटवून आणि सातारकरांना उपजिविकेसाठी परागंदा होण्यास लोकप्रिनिधी व त्यांचे स्वार्थी,आत्मकेंद्री, धूर्त राजकारण यशस्वी झाले आहे. आणि तेच सगळे याच्या मुळाशी आहेत. तेंव्हा त्यांना धक्का देण्यासाठी, शह देण्यासाठी आजमितीस वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसरा कोणताच भक्कम पर्याय उपलब्ध नाही. हे मी आधीच निर्धोकपणे सांगतो आहे. आजघडीला कोल्हापूर ला आयटी पार्क होत आहे .पण पुण्याच्या बाजूला असलेल्या सातारला काहीच नाही. सातारा सिटी, आणि जिल्ह्यातील लोकांना रोजगारासाठी गाव सोडून पुण्या मुंबईत जावे लागते आहे.

मात्र त्यांना मतदानाला फुकट गाड्या पाठवून गावी आणायला प्रस्थापित लोकप्रतिनिधींना अजिबात शरम वाटत नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे. इतके वर्ष सत्तेत असूनही पुण्या, मुंबईत रोजगारास जाणारे लोंढे, हे लोक थांबवू शकले नाहीत . लोकांच्या हाताला काम देऊ शकले नाहीत.अशाच डळमळीत नेतृत्वामुळे साताऱ्याचा विकास खुंटला हे सर्वमान्य आहे.

आणि साताऱ्याचा विकास हाच सत्तेचा केंद्रबिंदू मानून कोणत्याही कामाची जे जिल्हाभर आखणी केली असती तर साताऱ्याचे चित्र वेगळे असते. मात्र आजवर तशी अंमलबजावणी झालीच नाही. तर तरुणांना केवळ थिल्लरपणात स्वारस्य मानायला शिकविले गेले. पण त्यांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी, भविष्यासाठी कोणतीही धोरणे आखली गेली नाहीत.

आज घडीला हजारो तरुण सातारा जिल्ह्यातून सैन्य, पोलीस आणि विविध भरतीसाठी तयारी करतात. पण त्यातल्या किती जणांना नोकरी लागते. आणि किती जणांची परिस्थिती भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्याची आहे. त्यावर कोणी कधी बोलेल का?

याच सातारच्या रयत शिक्षण संस्थेचे कमवा आणि शिका हे धोरण घेऊन अनेकजण चमकले तोच सातारा आज विकासाकरिता चाचपडत आहे. इथे येऊन परप्रांतीय लोक उद्योग करून स्थिरावतात पण स्थानिक युवक मात्र कामासाठी वणवण भटकत राहतो. याचे मूल्यमापन करून या सुशिक्षित बेकार युवकाना स्वावलंबी बनविण्याचा आराखडा तयार करणे, उद्योग धंद्यांना प्रोत्साहन देवून ते निर्माण करणे ही काळाची गरज होती. पण आजवर तशी पावले उचलली गेली नाहीत. प्रतिसरकार म्हणून देशात गाजलेला सातारा आता अलीकडे दंगली मुळे गाजतोय. आणि तपास यंत्रणा ,मीडिया आणि राजकारणी मात्र एकांगी भूमिका घेत आहेत. पण डोळसपणे कुणी वर्मावर बोट ठेवत नाही. सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी,रोजगार,व्यापार,शेती, दुष्काळ, शिक्षण, आणि सामाजिक सलोखा हे सारे सुरक्षित करण्यासाठी आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी सारख्या जनसामान्यांचा बुलंद आवाज असलेल्या विचारधारेच्या पक्षाची साताऱ्याला गरज आहे.

म्हणून उद्या होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेला आवर्जून हजर राहून प्रत्येक सातारकराने साताऱ्याच्या बदलाची शपथ घ्यावी.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!