भारतीय संस्कृती :-

शास्त्रज्ञांच्या या विविध मतांच्या आधारे भारतीय संस्कृती वैदिक, बौद्ध आणि जैन संस्कृतीचे समन्वित रूप आहे. अनेकात्मकता आणि विविधतेत एकात्मता आणि एकता तिची विशेषता आहे. यामुळेच त्यानंतर निर्माण झालेल्या संस्कृतीच्या प्रक्रिया ह्या एक दुसऱ्यांनी प्रभावित झालेली दिसते. याशिवाय प्रत्येक संस्कृतीने भारतीय संस्कृतीला आपल्या योगदानाने समृद्ध केले आहे.
बौद्ध धम्म आणि संस्कृती श्रमण संस्कृतीचे प्रेरक प्रणाली आहे. त्याचे प्रासाद सम (समानता) शम (शांती) आणि श्रम (परिश्रम) ह्या तीन प्रमुख स्तंभावर आधारित आहे. यानुसारच समाजाचे संघटन ह्या तीनही सिद्धान्तावर प्रतिष्ठित झाले आहे. विषमता विसरून समानता, श्रमशीलता आणि क्षमाशीलता अशा कल्याणमार्गाने समाज आणि राष्ट्राने आपली प्रगती करावी याचे निर्देश यात आहे. व्यक्तीच्या श्रेष्ठत्वाचे प्रमाण त्याची ज्ञानमयकृती आणि चरित्र असावे. अहिंसात्मक साधनेने ह्या तिन्ही साधनेत निर्मलता वाढते आणि समत्वाची प्रतिष्ठा होते. हीच श्रेष्ठ भारतीय – संस्कृतीची आधारशीला मानली जाते. ही संस्कृती पालि वाङ्गमयातून प्रतिबिंबित होते. म्हणूनच पालि वाङ्गमय हे विकसित भारतीय संस्कृतीचे प्रतिक मानल्यास पालि वाङ्गमयाचा म्हणजेच बुद्धवचनाचा भारतीय संस्कृतीवर पोषक प्रभाव असल्याचे निदर्शनास येते.
*_पाली वाङ्गमय अर्थात बुद्धवचनः-_*
पालि वाङ्गमय हेच त्रिपिटक नावाने परिचित झालेले आहे. त्रिपिटक म्हणजे बुद्धवचन भगवान बुद्धाच्या आविर्भावाच्या – समकालीन परिस्थितीचे चित्रण विदारक होते. सहा संप्रदायाचे तत्वचिंतक आपापल्या स्तरावर समाजपरिवर्तनाची आपली जिज्ञासा व्यक्त करण्याच्या प्रयत्नात होते. अशा पार्श्वभूमीवर तथागताचे – पदार्पण समाजाभिमुख ठरले.
तथागतांनी सर्वोत्तम ज्ञान, सम्बोधी प्राप्त करून ‘बुद्ध’ पदाला पोहोचले. तत्कालीन ६२ मिध्यादृष्टींचा पर्दाफाश केला. पंचेचाळीस वर्षे देशभर निरंतर भ्रमंती करून धम्म प्रवेदित केला. त्या धम्मोप्पवेदित देसनेचे संकलित रूप त्रिपिटक वाङ्गमय तयार करण्यात आले. यामधूनच बुद्धांचे प्रामाणिक व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होते. संगीतीच्या माध्यमातून त्यांच्या देसनेला वाङ्गमयाचे रूप आकारात आणले गेले. हे संपूर्ण साहित्य म्हणजेच बौद्ध वाङ्गमय विश्ववाङ्गमयाचा एक अमूल्य निधी आहे.
सुत्तपिटकाचे पांचही निकाय, विनयपिटक आणि अभिधम्म यातून तथागतांचे प्रामाणिक वचन दृष्टीगत होतात. यामधून बुद्धांचे प्रमुख चिंतन चार आर्यसत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, कम्मक्खन्ध, प्रतित्यसमुत्पाद, शून्यवाद, अनित्य, अनात्म, दुःख इत्यादीचे स्पष्टीकरण केलेले आहे. यासोबतच सामाजिक जीवनातील अहिंसा, मैत्री, बंधुभाव, प्रेम, दान, शीलाचार अशा मूल्यांना प्ररोपित केले. ह्या सर्व नैतिक मूल्यांचा, तत्वज्ञानाचा, आदर्शाचा सारासार उहापोह वाङ्गमयातून झळकतो. अर्थातच हेच पालि वाङ्गमय बुद्धवचन आदर्श समाज जीवनाची आधारशीला बनण्यास समर्थ ठरते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत