बाळासाहेब आंबेडकर यांनी सभेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
लातूर सभा
दि. १० नोव्हेंबर २०२४
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी सभेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे –
🔶 राज्यातील विधानसभा निवडणूक ही आरक्षणाच्या मुद्द्या भोवती फिरणार आहे असे मी म्हणालो होतो. त्याप्रमाणे ही निवडणूक आरक्षणाच्या भोवती फिरत आहे हे लक्षात घ्या.
🔶 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. हा निकाल देताना सांगितले आहे की, स्थानिक पातळीवर ओबीसी किती आहेत? याचा डेटा नाही, याबाबत माहिती नाही आणि म्हणून 27 टक्के आरक्षण का? यावर सुप्रीम कोर्टाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
🔶 ओबीसी आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ओबीसी आरक्षण आपल्याला वाचवायचे असेल तर विधानसभेत आपले आमदार गेले पाहिजे.
🔶 सुप्रीम कोर्टाने एससी, एसटी आरक्षणात वर्गीकरण आणि क्रिमिलियर लागू करण्याचा निर्णय दिला आहे. हा निर्णय ज्याला मान्य आहे त्यांनी भाजपला आणि महाविकास आघाडीला मतदान द्यावे आणि ज्याला मान्य नाही त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान द्यावे.
🔶 या देशात लोकशाहीप्रेमी आणि संविधानवादी जो आहे त्यांनी भाजपला एवढे लाथाडल आणि त्यांनी भाजपला सांगितलं की तुम्ही संविधान बदलणार असाल तर आम्ही तुम्हालाच बदलल्याशिवाय राहणार नाही.
🔶 शिवसेनावाले आजही बाबरी आम्ही शहीद केली म्हणून डंका मिरवतात. माझा इथल्या मौलवींना, उलेमांना सवाल आहे की, जी वंचित बहुजन आघाडी मागील पाच वर्षापासून आपल्या पाठीशी उभी आहे. मग या 32 मतदारसंघात पाठिंबा द्यायला तुम्हाला लाज का वाटते?
🔶 लोकसभेला एमआयएमच्या इम्तियाज जलीलला आपण जिंकून दिले ज्यावेळी वंचितांना सत्तेत जाण्याची वेळ आली तेव्हा त्याने हात काढून घेतला आणि वेगळा मार्ग निवडला.
🔶 मी मुस्लिमांना सावध करतोय, संधी निघून गेली की लोक पाठ फिरवतात. असे आपले वागणे होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. जे दुःखात आपल्या सोबत उभे राहतात ते आपले मित्र आहेत. औरंगजेबच्या मजारीवर आम्ही चादर चढवली, तेव्हा केसेस थांबल्या हे लक्षात घ्या. वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत