“स्वतःला विश्वगुरूचं लेबल चिकटवणाऱ्या मोदींना…”; प्रकाश आंबेडकरांकडून ५ प्रश्न,

एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना प्रकाश आंबेडक म्हणाले “स्वतःला विश्वगुरूचं लेबल चिकटवणाऱ्या मोदींनी खालील ५ प्रश्नांची उत्तरे द्यावीत
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देशाची राजधानी दिल्लीत होत असलेल्या जी २० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ५ प्रश्न विचारले आहेत. यात त्यांनी चीनपासून मणिपूर हिंसाचार, देशातील मैला उचलण्याच्या कामातील कामगार आणि अल्पसंख्याकांना ठेचून मारण्याच्या घटनांचा समावेश आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू. स्वतःला विश्वगुरूचं लेबल चिकटवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझे काही प्रश्न आहेत.”
प्रकाश आंबेडकरांनी मोदींना विचारलेले ५ प्रश्न
१. इंडोनेशियामध्ये झालेल्या एशियन (ASEAN) शिखर संमेलनात भाषण करताना नरेंद्र मोदींनी कितीदा चीनचा उल्लेख केला?
२. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिल्लीतल्या जी २० संमेलनाकडे (G20Summit) पाठ का फिरवली आहे, हे मोदी सांगू शकतील का?
३. रशिया आणि चीनला मान्य व्हावे म्हणून युक्रेन युद्धावरच्या परिच्छेदात भारताने सुचवलेले बदल अमेरिका, इंग्लंड, युरोपियन युनियन आणि इतर पाश्चिमात्य देशांनी धुडकावून लावले आहेत हे खरे आहे का?
४. वर्षभराच्या अध्यक्षीय काळात चीन आणि रशियाचा विरोध पाहता युक्रेन युद्धाचा साधा उल्लेख असणारे किती संयुक्त निवेदने किंवा सर्वानुमते दस्तावेज निघाले?
५. दिल्लीतल्या संमेलनात कोणत्याच नेत्यांची घोषणा न होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे का? ज्यांच्या अध्यक्षतेखाली नेत्यांची घोषणा जाहीर होऊ शकली नाही, असा पहिला देश बनण्याची नामुष्की भारतावर ओढवणार आहे का? आणि यामुळे संपूर्ण जगात भारताची नाचक्की होणार नाही का?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत