महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

जेईई मेन 2024 च्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर. महाराष्ट्रातील 7 विद्यार्थ्यांनी मिळवले 100% गुण

दैनिक जागृत भारत च्या वतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनदन व पुढील वाटचालीस अनेक मंगल कामना.

लोकसभा निवडणुकी च्या गोंधळात शैक्षणिक क्षेत्रातून महत्वाची बातमी आहे. भविष्यात अभियांत्रिकी क्षेत्रात पदार्पण करून इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. जेईई मेन 2024 च्या दुसऱ्या सत्राचा निकाल नॅशनल  टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए ने जाहीर केला आहे. यात दोन मुलींसह 56 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना jeemain.nta.ac.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहता येणार आहे. 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जानेवारी आणि एप्रिल सत्रासाठी पेपर 1 बीई आणि बीटेकचा एकत्रित निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. यंदा एकूण 9.24 लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 8.2 लाख उमेदवारांनी जानेवारी आणि एप्रिलमध्ये झालेल्या जेईई मेन परीक्षा दिली होती. यातील 56 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी तेलंगणातील आहेत. तर महाराष्ट्र, आंधप्रदेश प्रत्येकी सात विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तर दिल्लीतील 6 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 

100 टक्के गुण मिळवलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी 

गजरे निलकृष्ण निर्मलकुमार : महाराष्ट्र
दक्षेश संजय मिश्रा : महाराष्ट्र
आर्यन प्रकाश: महाराष्ट्र
विशारद श्रीवास्तव : महाराष्ट्र
पाटील प्रणव प्रमोद : महाराष्ट्र
अर्चित राहुल पाटील : महाराष्ट्र
मुहम्मद सुफियान : महाराष्ट्र

तसेच JEE Main 2024 च्या दुसऱ्या सत्राचा निकालात 100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यंदाही तेलंगणामधील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तेलंगणातील 15 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तसेच यात महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्याना 100 टक्के गुण मिळवले आहेत. त्यासोबतच आंधप्रदेशातील सात आणि दिल्लीतील प्रत्येकी सहा विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तब्बल 2 लाख 50 हजार 284 मुलांनी आयआयटी प्रवेश परीक्षा जेईई ऍडव्हान्स साठी पात्र ठरले आहेत.

या निकालात 100 टक्के गुण मिळवलेल्या 56 उमेदवारांपैकी 40 उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत. तर 10 ओबीसी, 6 ईडब्ल्यूएस श्रेणीतील आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!